गुहागर वरचापाट दुर्गादेवी मंदिरात नवरात्रौ उत्सव
गुहागर, ता. 23 : वरचापाट येथील श्री. दुर्गादेवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुध्द प्रतिपदा सोमवार दि. 26 सप्टेंबर 22 ते अश्विन शु. नवमी मंगळवार दि. 4 ऑक्टोबर 22 पर्यंत आहे. नवरात्रामध्ये 10 दिवस धार्मिक, सांगितिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन देवस्थानने केले आहे. अशी माहिती श्री दुर्गादेवी देवस्थान फंडचे अध्यक्ष किरण खरे यांनी दिली. Honoring the Narratnas in Saradeya Navratri

सोमवार दि. 26 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दिवसात दररोज सकाळी 6 ते 6.30 श्रींची महापुजा, 7.30 ते 12 वा. सप्तशती पाठवाचन, दुपारी 12 वा. महानैवेद्य, संध्या 6.30 ते 7 वा. सायंपूजा, संध्या 7.15 ते 8 वा गोंधळ, आरती व मंत्रपुष्प असे कार्यक्रम मंदिरात होणार आहेत. Honoring the Narratnas in Saradeya Navratri
नवरात्र उत्सवातील प्रमुख आकर्षण असलेला श्रींच्या महावस्त्रांचा लिलाव मंगळवार दि. 28/9/22 ते सोमवार दि. 3/10/22 दररोज दु. 3 ते सायं. 5 वा. वेळत होणार आहे. कुलदेवतेचा प्रसाद म्हणून देवीची साडी घेण्यासाठी गुहागर तालुक्याबरोबरच मुंबई, पुणे आदी ठिकाणाहून महावस्त्रांच्या लिलावासाठी भक्त येतात. या लिलावातून देवस्थानला मिळणाऱ्या पैशांपेक्षाही मला माझ्या आईची साडी प्रसाद म्हणून मिळाली. या भावनेतून ओसंडणारी तृप्ती इथे पहायला मिळते. Honoring the Narratnas in Saradeya Navratri
विविध कार्यक्रम
सोमवार दि. 26/9/22 रोजी दु. 3.30 ते सायं. 5 वा. कलावती आई भजन मंडळ, वरचापाट यांचे सुश्राव्य भजन, सायं. 5.30 ते 7 वा. ह.भ. प. सौ. स्मिता जोशी, डोंबिवली यांचे सुश्राव्य किर्तन, रात्री 9.30 ते 11 वा. गोपाळकृष्ण आरती मंडळ, खालचापाट गुहागर, आरती व मंत्रपुष्पांजली.
मंगळवार दि. 27/9/22 रोजी रात्रौ 9.30 ते 11 वा. व्याख्यान – स्वातंत्र्यवीर सावरकर (वक्ते श्री. श्रीनिवास पेंडसे)
बुधवार दि. 28/9/22 रोजी रात्रौ 9.30 ते 11 वा. व्याख्यान – पृथ्वीराज चौहान (वक्ते श्री. श्रीनिवास पेंडसे)
गुरुवार दि. 29/9/22 रोजी सकाळी 10 ते 1 वा. महिलांसाठी अस्थि आरोग्य शिबीर आणि आहार विहार आणि उपचार मार्गदर्शन लाभणार आहे. यासाठी जी. एस. कुलकर्णी हॉस्पिटल, मिरज डॉ. सौ. मधुरा दिक्षित कुलकर्णी तपासणी करणार आहेत. रात्रौ. 9.30 ते 11 वा. भावगीत व भक्तीगीतांचा बहारदार कार्यक्रम सौ. श्रध्दा मेंहदंळे दामले सादर करणार आहेत. Honoring the Narratnas in Saradeya Navratri
शुक्रवार दि.30/9/22 रोजी रात्रौ. 9.30 ते 11 वा. व्याख्यान – वंदे मातरम् (वक्ते श्री. धनंजय चितळे, चिपळूण).
शनिवार दि. 1/10/22 रोजी रात्रौ. 9.30 ते 11 वा. गुहागर तालुक्यातील माजी सैनिक यांचा सन्मान सोहळा, प्रमुख उपस्थिती मा. आमदार डॉ. विनयजी नातू, मा. श्री. अंकुशजी खोटे, फौजी, अध्यक्ष, त्रिदल सैनिक संघ बीड, जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणार आहे.
रविवार दि. 2/10/22 रोजी रात्रौ. 9.30 ते 11 वा. वीरमाता व नवदुर्गा आणि स्वातंत्र सैनिक यांचा सन्मान सोहळा प्रमुख उपस्थिती मा. आमदार डॉ. विनयजी नातू, मा. श्री. अंकुशजी खोटे, फौजी, अध्यक्ष, त्रिदल सैनिक संघ बीड, जिल्हाध्यक्ष सौ. निलमताई गोंधळी भाजपा राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत होणार आहे. Honoring the Narratnas in Saradeya Navratri

सोमवार दि. 03/10/22 रोजी रात्रौ. 9.ते 10.15 वा. आर्युवेदोक्त आहार विहार वक्ते आर्युवेदाचार्य रत्नाकर थत्ते (चिपळूण), रात्रौ. 10.15 ते 11.15 वा. नृत्य मल्हार कथ्थक अकादमी चिपळूण प्रस्तुत भावविधा करणार आहेत. मंगळवार दि. 04/10/22 रोजी सकाळी 7 ते 11 वा. नवचंडी व पूर्णाहूती, दु. 12.30 ते 2 वा. महाप्रसाद, रात्रौ 9.30 ते 11 वा. दुर्गाश्री संगीत रजनी, गायिका, मुग्धा गावकर, फोंडा गोवा. चैतन्य परब, रत्नागिरी तबला साथ-रुपक वझे, मुंबई. संवादिनी – वरद सोहोनी, रत्नागिरी पखवाज-अमोद गोळे, गुहागर. रात्रौ 11 वा. लळीताचे किर्तन ह.भ.प.सुमंतबुवा भिडे Honoring the Narratnas in Saradeya Navratri
