• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

रत्नागिरीत स्पर्धा परिक्षा केंद्राचे उद्घाटन

by Ganesh Dhanawade
September 22, 2022
in Ratnagiri
17 0
0
Competitive Exam Center at Ratnagiri
34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार उद्घाटन

रत्नागिरी, ता.22 : मुंबई विद्यापीठाच्या चरित्रकार पद्मभूषण डॉ धनंजय कीर रत्नागिरी उपपरिसरातील स्पर्धा परिक्षा केंद्राचं उद्घाटन समारंभ २४ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ दिंगंबर शिर्के यांच्या शुभहस्ते होणार आहे. असल्याची माहिती रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी दिली. Competitive Exam Center at Ratnagiri

हा कार्यक्रम रत्नागिरी उपपरिसरात संपन्न होणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग आणि विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करण्यासाठी हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. कोकणातून अधिकाअधिक अधिकारी घडावेत आणि स्पर्धा परिक्षेच्या तयारीसाठी असणारं केंद्र रत्नागिरीत सुरू व्हावं, यासाठी राज्याचे तत्कालीन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व आताचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला होता. रत्नागिरीतील विद्यार्थी स्पर्धा परिक्षेसाठी पुढे यावेत तसेच विद्यार्थ्याना अभ्यासासाठी परिपूर्ण असं केंद्र तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसराने पुढाकार घेतला आणि अखेर हे केंद्र आता तयार झालं आहे.  Competitive Exam Center at Ratnagiri

Competitive Exam Center at Ratnagiri

कोकणातील खास करून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीजास्त लाभ या स्पर्धा परिक्षा केंद्राचा घ्यावा असं आवाहन रत्नागिरी उपपरिसराचे प्रभारी संचालक डॉ किशोर सुखटणकर आणि प्रभारी कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांनी केलं आहे. Competitive Exam Center at Ratnagiri

Tags: Competitive Exam Center at RatnagiriGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.