गुहागर, ता. 21 : जानवळे येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण महाअभियाना अंतर्गत कार्यक्रम घेण्यात आला. माता व किशोरवयीन मुलींना आहार व आरोग्य याविषयावर RBSK पथकाच्या डॉ. पुजा जाधव व खेतले सिस्टर यांनी मार्गदर्शन केले. Guidance to mothers and daughters at Janwale

या कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन झाली. डॉ. पुजा जाधव यांनी फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्य यांचे महत्व पटवून दिले. गरोदर, स्तनदा मातांना आहार कसा घ्यावा, कोणता घ्यावा, याचे मार्गदर्शन केले. तसेच लिंग संवेदन शीलता, लिंगभाव समानता, किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन, आहार, आरोग्य या विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर C.B.E. कार्यक्रमाअंतर्गत गरोदर पणाचा तिसरा चौथा महिना हा कार्यक्रम घेण्यात आला. Guidance to mothers and daughters at Janwale

या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका सौ. श्रध्दा बेलवलकर, आशा, अमृता जानवलकर, मराठी शाळा उपशिक्षिका सौ. इंदिरा बोटरे, मदतनिस, सौ. भगवेबाई तसेच सर्व माता पालक, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली उपस्थित होत्या. शेवटी सर्वांचे आभार मानून व अल्पहार देवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. Guidance to mothers and daughters at Janwale
