केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिले आश्वासन
नवी दिल्ली, ता. 21: कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. Nivli- Jaigad road four-lane

राज्याच्या आणि कोकणच्या विविध विकासात्मक विषयांसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी, निवळी – जयगड रस्त्याच्या कामाची पूर्तता लवकरच होणार असल्याचे वचन मंत्री गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले. Nivli- Jaigad road four-lane
यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, निवळी – जयगड रस्त्याचा प्रस्ताव पाठीमागे झालेल्या बैठकीत सादर करण्यास सांगितले होते. आज याबाबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असून हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. Nivli- Jaigad road four-lane

मंत्री उदय सामंत म्हणाले, निवळी – जयगड रस्त्याचे चौपदरीकरण झाल्यास अपघाताचे प्रमाण कमी होणार असून वाहतूक कोंडीस आळा बसणार आहे. बंदराला रस्ते वाहतूकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण आहे. Nivli- Jaigad road four-lane
