• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन वर्ग संपन्न

by Ganesh Dhanawade
September 21, 2022
in Guhagar
24 0
0
Guidance class for adolescent girls
47
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे आयोजन

गुहागर, ता. 21 : तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे प्रशालेमध्ये किशोरवयीन मुलींसाठी मार्गदर्शन वर्ग पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. महावीर थरकार, ज्येष्ठ शिक्षिका सौ. संपदा चव्हाण, मार्गदर्शक सौ. नमिता वैद्य उपस्थित होत्या. Guidance class for adolescent girls

सौ.नमिता वैद्य यांनी मुलींची किशोरवयीन अवस्थेमध्ये होणारी मानसिक स्थिती त्याबरोबरच त्यांच्या शरीरामध्ये होणारे विविध बद्दल याविषयी त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. पौगंडावस्थेमध्ये मुलींच्या मानसिक व शारीरिक अवस्थेमध्ये विविध बदल होतात. त्यांची मासिक पाळी सुरू होते. त्यासोबतच त्यांच्या स्वभावामध्ये सुद्धा चिडचिडेपणा, रागीटपणा, लहरीपणा असे विविध बदल घडत असतात. या सर्व बदलांशी समायोजन करून घेणे आवश्यक आहे. तसेच मासिक पाळी मुलींच्या भविष्यातील मातृत्वासाठी किती महत्त्वाची आहे याची माहिती दिली. त्यामुळे या कालावधीमध्ये स्वतःच्या कपड्यांची स्वच्छता, शरीर स्वच्छता, शारीरिक व मानसिक आरोग्य याबाबत मार्गदर्शन केले. मुलींनी वाढीच्या या वयामध्ये कोणते पदार्थ खावे. कोणत्या पदार्थांमधून जीवनसत्वे प्रथिने लोह कॅल्शियम मिळते, याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. आपल्याकडे सहज उपलब्ध शेगादाणे- गुळ यासांरख्या पदार्थांबाबत माहिती दिली. त्या सोबत किशोरवयामध्ये मुलींना विविध आकर्षणे आणि प्रलोभनांद्वारे कसे फसविण्यात येते याबाबत विवेचन केले. समाजातील समाजकंटकांद्वारे मुलींना कशा पद्धतीनेविविध प्रलोभनांच्या आहारी जाण्यासाठी बळी पाडले जाते याविषयी माहिती देऊन मुलींना जागरूक करण्याचे काम यावेळी करण्यात आले. Guidance class for adolescent girls

Guidance class for adolescent girls

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सौ. चव्हाण यांनी मुलींना मासिक पाळी विषयी माहिती देणे आवश्यक असल्याबाबत सांगितले. त्याबरोबरच मुख्याध्यापक श्री. थरकर यांनी शुभेच्छा देताना मुलींच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी प्रयत्न करणे आमचे कर्तव्य आहे असे सांगितले. शेवटी विद्यार्थीनी शमिका भिडे हिने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. Guidance class for adolescent girls

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiGuidance class for adolescent girlsLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share19SendTweet12
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.