गुहागर, ता.18 : तालुक्यात मुदत पूर्ण झालेल्या पाच ग्रा. पं. मध्ये सार्वत्रिक निवडणुका जाहिर झाल्या आहेत. या निवडणूकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात प्रथमच थेट सरपंच पद निवडणूक होणार असून ही सर्व पाचही सरपंच पदे महिला भूषविणार आहेत. या गावांमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी जाहिर झाले आहेत. Administrative system ready for election
गुहागर तालुक्यातील अंजनवेल, वेलदूर, चिंद्रावळे, वेळंब व परचुरी अशा पाच ग्रा. पं. मध्ये निवडणूका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये अंजनवेल – नामाप्र स्त्री, वेलदूर – नामाप्र स्त्री, चिंद्रावळे – नामाप्र स्त्री, वेळंब – सर्व साधारण स्त्री, परचुरी- सर्व साधारण स्त्री असे सरपंच आरक्षण असून या पाचही ग्रा.पं. मध्ये थेट सरपंच म्हणून पहिल्यांदाच महिला बसणार आहेत. Administrative system ready for election
या पाच ग्रा. पं. मधील सदस्य निवडणूक व सरपंच निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी जाहिर झाले आहेत. अंजनवेल – एस एस कांबळे (विस्तार अधिकारी पंचायत समिती गुहागर), वेलदूर – श्री. बुरुंगले (सहा. अभियंता – सार्व. बांधकाम विभाग गुहागर) चिंद्रावळे – श्री शिवम सोळंके (सहा. अभियंता सार्व. बांधकाम विभाग गुहागर), वेळंब – श्री. बी. एस. कोळी (कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय गुहागर), परचुरी – आर के धायगुडे (विस्तार अधिकारी पंचायत समिती गुहागर) हे अधिकारी काम पाहणार आहेत. Administrative system ready for election