आबलोली, ता.18 : पतीच्या निधनानंतर कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे आदींसह विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत आबलोली विशेष ग्रामसभेत घेण्यात आला आहे. Abolition of widow practice in Aabloli

निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांची विशेष ग्रामसभा जिल्हा परिषद केंद्र शाळा आबलोली नं. १ येथे सरपंच सौ. श्रावणी अनिकेत पागडे यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. विधवा प्रथा बंद करण्याबाबत ग्रामसेवक श्री. बी.बी. सूर्यवंशी यांनी शासनाचे परिपत्रक वाचून मार्गदर्शन केले. त्यानंतर सौ. कविता हेमंत पवार यांनी विधवा प्रथा बंद करावी ही सूचना मांडली. या ठरावाला सिद्धार्थ जाधव यांनी अनूमोदन देत संपूर्ण सभागृहाने टाळ्यांच्या कडकडाटात ठरावाचे स्वागत केले. Abolition of widow practice in Aabloli
निर्मल ग्रामपंचायत आबलोलीने आपल्या ठरावामध्ये म्हटले आहे की, आपल्या समाजात पतीच्या निधनानंतर अंत्यविधीवेळी पत्नीच्या कपाळावरचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे असे विधी केले जातात. परंतू यापूढे असे विधी बंद करण्यात येणार आहे. त्या विधवा महिलेला विधवा म्हणून कोणत्याहि प्रकारचे धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी करुन घेणे बंधनकारक असून कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जिवन जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. विधवा महिलांना सन्मानाने जगता आले पाहिजे याकरीता आबलोली ग्रामपंचयतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Abolition of widow practice in Aabloli

या ग्रामभेला सरपंच सौ. श्रावणी पागडे , उपसरपंच आशिष भोसले , ग्रामसेवक श्री. बी.बी. सुर्यवंशी, तंटामुक्ती अध्यक्ष आप्पा कदम, पोलिस पाटील महेश भाटकर, ग्रामपंचायत सदस्य प्रमेय आर्यमाने, तुकाराम पागडे, सदस्या सौ. मिनल कदम, भारती कदम, साक्षी रेपाळ, पूजा कारेकर, मुग्धा पागडे, महेंद्र कदम, विजय वैद्य, अविनाश कदम, शिवाजी गुरसळे, विलास शेट्ये, मुख्याध्यापिका श्रीम. प्रिया गुहागरकर, सौ. ममता जाधव, सुरेश पवार, गणपत घाणेकर, दत्ताराम करंजकर, विक्रांत पागडे, अमित पवार, चंद्रकांत करंजकर, रिया पागडे, विनीता ठोंबरे, सुहासिनी पागडे, सुनिता पागडे, अंजनी पागडे, नम्रता मते, सुदिक्षा पागडे, संजिवनी वैद्य, मोहिनी पांचाळ, सुहासिनी पवार, नयना वैद्य, अर्पीता वैद्य, संजना पवार आदिंसह अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. Abolition of widow practice in Aabloli
