शृंगारतळी आठवडाबाजारात रॅलीने केली जनजागृती
गुहागर, ता. 17 : राष्ट्रीय पोषण महिना अभियानाची जनजागृती होण्यासाठी चिखली बीट नं. 2 मधील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आज आठवडाबाजारात रॅली काढली. या रॅलीतुन बाजारात आलेल्या नागरिकांना पोषण आहारानिमित्त माहिती दिली. तसेच बाजारातील व्यापाऱ्यांना मुलांसाठी पोषक आहार म्हणून फळे व पौष्टीक भाज्या मोफत देण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांनी आपल्याकडील फळे व भाज्या मोफत दिल्या. Awareness in Sringaratali weekly market

1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा महिला राष्ट्रीय पोषण महिना अभियान अंगणवाड्यांवर राबविले जात आहे. या अभियानामधुन मुलांना पुरक पोषण आहार देण्याबरोबरच पालकांमध्येही या आहाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. लहान मुलांना कुपोषणमुक्त, सुदृढ बनविण्यासाठी रोजच्या आहारात फळे आणि पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे. हा विचार सर्वांपर्यंत पोचवा. म्हणून एक आगळेवेगळे अभियान चिखली बीट क्र. 2 मधील 8 अंगणवाडी सेविका व 2 मदतनिसांनी केले. Awareness in Sringaratali weekly market
चिखली बीट क्र. 2 अंतर्गत पाटपन्हाळे, कोंड शृंगारी, शृंगारतळी बाजारपेठ, वेळंब रोड रोशन मोहल्ला, पाटपन्हाळे गणेशवाडी, भेकरेवाडी, पिंपळवट व वाकी या 8 अंगणवाड्या येतात. येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पर्यवेक्षिका सी. सी. हळ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आठवडाबाजारातून रॅली काढली. यावेळी सही पोषण देश रोशन, बेटी बचाव बेटी पढाव यासह पुरक पोषण आहारा संदर्भात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर 8 अंगणवाड्यांमधील मुलांना फळे व पौष्टीक भाज्या मिळाव्यात म्हणून रॅलीतील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आठवडाबाजारातील सर्व व्यापाऱ्यांची भेट घेतली. स्वखुशीने आपण मोफत फळे व भाज्या द्याव्यात असे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देताना व्यापाऱ्यांनी आपल्याकडील सफरचंद, केळी, पपई, पेरु, चिबुड, काकडी, मक्याची कणसे, पालेभाज्या, टॉमेटो, गाजर आदी वस्तु मोफत दिल्या. Awareness in Sringaratali weekly market

सकाळच्या वेळात अंगणवाडीचे कामकाज करुन, मुलांना पोषण आहार दिल्यानंतर दुपारी 12 वाजता ही रॅली काढण्यात आली. यामध्ये श्रिया वानरकर, मनाली कोलके, सारिका हळदणकर, रियाना घारे, साक्षी रजपुत, शारदा पवार, श्रावणी वेंद्रे, स्वप्नाली कदम, राजश्री साळवी व मयुरी रांजाणे या महिला सहभागी झाल्या होत्या. Awareness in Sringaratali weekly market
