बँक खात्यातून अज्ञाताने ७६ हजार रुपये काढले
गुहागर, ता.17 : कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा कॉल नाही, बँकेची माहिती कोणाला शेअर केलेली नाही किंवा कोणत्याही बँकेचा ओटीपी आलेला नसताना अंजनवेल येथील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर असलेल्या अधिकाऱ्याच्या बँक खात्यातून अज्ञाताने ऑनलाईन ७६ हजार ७३४ रुपयांची फसवणूक केल्याची घटना गुरुवारी (दि. 15 रोजी) घडली. याप्रकरणी गुहागर पोलीस स्थानकात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Online cheating of the officer

अधिक माहिती अशी की, गॅस आणि विद्युत प्रकल्पातील कोकण एलएनजी पोर्ट मॅनेजर दिलीप कुमार रामजन्म सिंह (वय-४१), सध्या रा. अंजनेवल ब्राम्हणवाडी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. ते मार्च २०२१ पासुन नोकरीत आहेत. त्यांचे अॅक्सीसी बँक साक्ची जि. जमशेदपूर, राज्य झारंखड येथे सुमारे २०१२ साली एन.आर.आय. सेर्वीग अकाऊँट ओपन केलेल आहे. त्याचा दिनांक १६/०९/२०२२ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या सुमारास ते झोपेतून उठले. व नेहमीप्रमाणे मेल अकाऊँट ओपन करून ते ऑफिसचे मेल चेक करत असताना त्यांना अॅक्सीस बॅकेचे मेल प्राप्त झाले. या अकाऊँट मधून ७६,७३४/- रूपये हे डेबीट झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांनी अॅक्सीस बँक कस्टमर केअर व ऑनलाईन अप्लीकेशनद्वारे डेबीट झालेल्या पैश्याची स्लीप काढली. त्यानंतर होम ब्राँच मध्ये ७६,७३४/- रूपयांचे झालेले ट्रान्सेक्शन बाबत प्रकार सांगितला व अकाऊंट ब्लॉक करण्यास सांगीतले. दि. १५ ते १६ रोजी या कालावधीत बँक स्टेटमेंट प्रमाणे त्यांच्या अॅक्सीसी बँक अकाऊँट मधून ७६,७३४/- रूपये कट झालेले आहेत. Online cheating of the officer

दरम्यान, पैसे कट होण्याआधी कोणताही अनोळखी कॉल आलेला नाही. त्यांनी बँकेची डिटेल्स कोणाला शेअर केलेला नाही. तसेच कोणताही बँकेचा ओटीपी आलेला नाही. अशाप्रकारे अज्ञात इसमाने ऑनलाईन फसवणूक केल्याची तक्रार त्यांनी दिली आहे. याप्रकरणी गुहागर पोलीस अधिक तपास करत आहेत. Online cheating of the officer
