गुहागर, ता.17 : तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे पाटपन्हाळे (Patpanhale Education Society) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील आर्टस रिसोर्स सेंटरच्या वतीने निलय फाउंडेशन यांचे सहकार्याने नुकताच एक दिवशीय सेमिनार संपन्न झाला. सक्सेस मंत्र-बौध्दिक कौशल्य या विषयावर सदर सेमिनार आयोजित करण्यात आला होता. Success Program of Nilay Foundation

पुणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या निलय फाउंडेशन ग्रुप पुणे यांच्या मार्फत प्राध्यापक चेतन गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांरी सदर कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी श्री. चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला महाविद्यालयाचे मा. प्राचार्य प्रमोद देसाई यांनी चेतन गोडबोले यांचे व सहकार्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर प्रमोद देसाई व आर्टस रिसोर्स सेंटर प्रमुख डॉ. दिनेश पारखे यांचे स्वागत विभागाच्या वतीने डॉ. प्रवीण सनये यांना केले. Success Program of Nilay Foundation
या सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांनी पदवी नंतर विविध प्रकारचे नोकरीसाठी प्रयत्न करताना त्यांच्यामध्ये कोणती कौशल्य आवश्यक आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाबरोबरच अंगभूत गुण, संवाद कौशल्य, संस्कार आणि शिस्त आवश्यक आहे. त्याबद्दल माहिती समजावून सांगितली. तृतीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थ्यीनी कु. कोमल झिंबर यांच्या सहकार्याने प्रा. चेतन गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स कशी विकसित करायची आणि त्यांचा वापर कसा करायचा याचे प्रात्यक्षित दाखवले. Success Program of Nilay Foundation
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनमध्ये प्रचंड क्षमता असते. मात्र भाषेच्या व भितीच्या न्यूनगंडामुळे ते मागे राहतात. याकरिता विद्यार्थ्यांनी त्यावर मात करणे आवश्यक आहे. यासाठी संस्था सर्वतोपरी मदत करेल याचा विश्वास त्यांनी दिला. काही विद्यार्थ्यांना निलय फाउंडेशनच्या कोर्स मार्फत चांगल्या संस्थात नोकरी मिळवली आहे. याचा विशेष उल्लेख करुन निलय फाउंडेशन महाविद्यालयास पुढील काळातही मदत करेल याची ग्वाही त्यांनी दिली. महाविद्यालयाचे प्रा. प्रमोद देसाई यांनी आपल्या देशातील तसेच परदेशातील श्रीमंताची माहिती देऊन ते कसे त्या ठिकाणी जाऊन पोचले हा आदर्श विद्यार्थ्यांना घ्यावा असे मत व्यक्त केले. Success Program of Nilay Foundation

सदर सेमिनारच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेश पारखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. प्रसाद भागवत यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनात डॉ. प्रविण सनये, डॉ. जे.एस. जाधव यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. या सेमिनारच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली. Success Program of Nilay Foundation
