गुहागर, ता. 17 : लायन्स क्लबच्या पद्धतीप्रमाणे क्लबची स्थापना झाल्यावर या क्लबच्या कार्यपध्दतीची ओळख प्रतिज्ञाधारी सभासदांना करुन देण्यात येते. गुहागर सिटी लायन्स क्लबची स्थापना ऑगस्टमध्ये झाली. त्यानंतर या क्लबच्या सभासदांसाठी अधिमुखता परिसंवाद (ओरिएंटेशन सेमिनार) आयोजित करण्यात आला होता. हा परिसंवाद उत्साहात झाला. The first seminar of the Lions Club

क्लबच्या कार्यपध्दतीविषयी, ध्येय धोरणांविषयी माहिती देण्यासाठी लायन्स क्लबचे अधिकारी उदय लोध आले होते. त्यांनी पॉवर पॉईन्ट प्रेझेन्टेशनद्वारे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला माजी रिजन चेअरमन नितीन गांधी, श्रीनिवास परांजपे, तुषार गोखले, जगदीश वाघुळदे व माजी झोन चेअरमन गुलाम पारेख उपस्थित होते. The first seminar of the Lions Club
गुहागर क्लबचे अध्यक्ष शामकांत खातू, सेक्रेटरी संतोष वरंडे व खजिनदार सचिन मुसळे व त्यांच्या संपूर्ण टीमने स्वागत, आदरातिथ्य मान्यवरांची ओळख, निवेदन व संपूर्ण कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाल्याने लायन्सच्या झोन चेअरमन चेतना होमकर यांनी गुहागर सिटी क्लबचे अभिनंदन केले. ला. उदयजी लोध यांच्या मार्गदर्शनामुळे खऱ्या अर्थाने लाईनीझमची ओळख झाली. अशी प्रतिक्रिया शामकांत खातू यांनी व्यक्त केली. The first seminar of the Lions Club

