समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी गुहागरकर सज्ज
गुहागर, ता. 16 : जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी (ता. 17 सप्टेंबर) गुहागरकर मानवी साखळी करुन समुद्राला राष्ट्रगिताद्वारे मानवंदना देणार आहेत. त्यानंतर शहरातील विद्यार्थी आणि नागरिक गुहागरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छताही करणार आहेत. गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली हे अभियान होणार आहे. जागतिक समुद्रकिनारे स्वच्छता दिन आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे.

या मोहिमेमध्ये तहसीलदार सौ. वराळे यांच्या नेतृत्त्वाखाली गुहागर नगरपंचायत, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी, सागरी सीमा मंच, खरे ढेरे भोसले महाविद्यालय व रिगल महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आरजीपीपीएल, लायन्स क्लब गुहागर, पर्यटन व हॉटेल व्यावसायिक, गुहागर तालुका पत्रकार संघ, प्रजापिता ब्रह्मकुमारी संस्था, व्याडेश्र्वर देवस्थान, जीवनश्री प्रतिष्ठान आदी अनेक संस्था संघटना स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. Guhagarkar ready to clean the beach
प्रत्यक्ष कार्यक्रमाचे नियोजनाबाबत सौ. वराळे म्हणाल्या की, शनिवारी सकाळी 9 वाजता पोलीस परेड मैदानासमोरील समुद्रकिनाऱ्यावर सर्वजण एकत्र येतील. 9.15 वा. राष्ट्रगिताने अभियानाची सुरवात होईल. त्यानंतर प्रतिज्ञा घेवून सर्वजण मानवी साखळी करुन सागराला मानवंदना देतील. ही साखळी 2 कि.मी.पेक्षा अधिक अंतराची असेल. त्यानंतर एक तास सर्वजण समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता करतील. Guhagarkar ready to clean the beach
अभियानासाठी आवश्यक असलेले साहित्य, पाणी आदी व्यवस्था आरजपीपीएल व गुहागर नगरपंचायत करणार आहे. अभियानानंतरही समुद्रावर गोळा झालेला कचरा उचलण्याची व्यवस्था नगरपंचायतीच्या स्वच्छता विभागामार्फत केली जाणार आहे. अभियान संपल्यावर अल्पोपाहाराची व्यवस्था लायन्स क्लब गुहागर आणि सागरी सीमा मंच करणार आहे. प्रत्यक्ष स्वच्छतेसंबंधीचे नियोजन होमगार्ड तालुका समादेशक कांबळे सर, गुहागर हायस्कुल, खरे ढेरे महाविद्यालय आणि रिगल कॉलेजचे शिक्षक करणार आहेत. या अभियानामध्ये गुहागर मधील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले आहे. Guhagarkar ready to clean the beach

नगरपंचायतीने आधीच सुरु केली मोहिम सतत पडणाऱ्या पावसामुळे व उधाणाच्या भरतीमुळे गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रचंड कचरा आला आहे. 17 सप्टेंबरच्या स्वच्छता मोहिमेला गती मिळावी, म्हणून गेले तीन दिवस गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती प्रसाद बोले आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह समुद्रकिनाऱ्यावरील कचरा दुर करण्याचे काम करत आहेत. स्वच्छता मोहिमेसाठी आवश्यक सर्व साहित्याची व्यवस्था गुहागर नगरपंचायत करणार आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी गेले तीन दिवस गुहागर नगरपंचायतीचे आरोग्य व स्वच्छता सभापती आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांसह समुद्रकिनाऱ्यावरील कचरा दुर करण्याचे काम करत आहेत. Guhagarkar ready to clean the beach
