• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खोडदे येथील संशयीत पोलीसांच्या ताब्यात

by Ganesh Dhanawade
September 16, 2022
in Guhagar
19 0
0
The accused was found within four hours
37
SHARES
106
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

शाळा, मंदिरांची रेखी करत असल्याचा ग्रामस्थांना आला संशय

गुहागर, ता.16 : तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत खोडदे हद्दीतील पुढची निवातेवाडी येथे अनोळखी व्यक्ती मदतीसाठी लोकांकडून अनाधिकृतपणे पैसे जमवण्याचा बहाणा करून गावाची, शाळेची, मंदिरांची रेखी करत होती. याचा संशय वाडीतील ग्रामस्थांना आल्यावर त्यांनी ग्रामपंचायतीला कळविले. आणि या संशयीतास ग्रामस्थांनी पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. यामध्ये ग्रामस्थांनी सतर्कता दाखविल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. Suspect from Khodde in police custody

खोडदे गावात ग्रामस्थांनी एका इसमाला फिरताना पाहिल्यावर संशय आला. त्यांनी त्याला खोडदे ग्रामपंचायतीमध्ये आणले. त्यानंतर सरपंच श्री. प्रदीप मोहिते, उपसरपंच श्री. लवेश पवार, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. राजेंद्र साळवी, पोलिस पाटील श्री. महेश भाटकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. विलास गुरव, श्री. राजेंद्र साळवी, श्री. शरद साळवी, सदस्य श्री. विनायक गुरव, श्री. शंकर साळवी यांच्या उपस्थितीत वरील विषयावर चर्चा करून संशयीत इसम (विजय भिमराव चौघुले रा. सोनई ता. नेवासा) याची विचारपूस केली. व त्याने गावात जमा करत असलेल्या पैशांची माहिती लेखी स्वरूपात ग्रामपंचायतीला लिहून दिली. Suspect from Khodde in police custody

त्यानंतर त्याला गुहागर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्याबद्दलची तक्रार श्री. विलास गुरव, श्री. राजेंद्र पढरीनाथ साळवी व श्री, शरद साळवी यांनी दिली. गावात अशाप्रकारची अनोळखी आणि संशयीत व्यक्ती आढलून आल्यास ग्रामस्थांनी सावध रहावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विलास गुरव यांनी केले आहे. Suspect from Khodde in police custody

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSuspect from Khodde in police custodyUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share15SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.