• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

by Manoj Bavdhankar
September 15, 2022
in Guhagar
18 1
0
Teacher's Day celebrated in Guhagar College
36
SHARES
103
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता. 15 : श्री. देव  गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. 14 सप्टेबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या स्मृतिदिनानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. Teacher’s Day celebrated in Guhagar College

Teacher's Day celebrated in Guhagar College

शिक्षक दिन म्हणजे आपल्या जवळील ज्ञान भांडार खुले करत निरपेक्षपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत “न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते” हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे, अशा शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय. सुशिक्षित समाज आणि उत्तम व्यक्तित्व निर्मितीकरिता शिक्षक हाच आधारस्तंभ असतो. भारतीय ज्ञानपरंपरेत गुरु शिष्य परंपरेला अतिशय महत्त्व असून पाश्चात्य आक्रमणे होऊनही जी समृद्ध भारतीय संस्कृती अखंडितपणे टिकून राहण्याचे मुख्य कारण म्हणजे गुरु- शिष्य परंपरा होय. Teacher’s Day celebrated in Guhagar College

Teacher's Day celebrated in Guhagar College

या कार्यक्रमात इ. 12वीच्या कला, वाणिज्य, शास्त्र शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. एकूण 32 विद्यार्थ्यांनी अभिरुप शिक्षकांचे काम केले. यामध्ये  कु.अथर्व रहाटे हा विद्यार्थीने मुख्याध्यापकाचे काम केले. तर वाणिज्य शाखेतील कु. शिवानी पवार हिने उपमुख्याध्यापक ही भुमिका केली. कु. अथर्व घाणेकर यांनी पर्यवेक्षक म्हणून काम पाहिले. व इतर विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनूसार विषय निवडून वर्गामध्ये अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शिक्षकी पेशा यामध्ये आदरभाव वृद्धींगत व्हावा, शिक्षकांचे कार्य भुमिका समजावी हा यामागचा उद्देश होता. Teacher’s Day celebrated in Guhagar College

Teacher's Day celebrated in Guhagar College

शिक्षक हा सामाजिक अभियंता आहे. समाज घडवण्यामध्ये शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे. असे विचार महाविद्यालयाचे पर्यवेक्षक (विभाग प्रमुख) श्री. कोरके यांनी मांडले. सौ. बावधनकर मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शिक्षक दिननिमित्त विद्यार्थ्यांमधून अभिरुप शिक्षकांनी आपले अनुभव मनोगतातून व्यक्त केले. ह्या कार्यक्रमाचे आभार सौ. पालशेतकर मॅडम तर सुत्रसंचालन कु. दिक्षा रांजाणे हिने केले. तसेच हा सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील श्री. कोरके, श्री. खोत, श्री. मेटकरी, श्री. देशपांडे, सौ. बावधनकर, सौ. पालशेकर, सौ. माळी, श्री. कटरे, श्री. पाटील, सौ. परचुरे, श्री. फिलसे, श्री. वैध, श्री. अनगुडे यानी मोलाचे सहकार्य केले. या संपुर्ण कार्यक्रमाला मुख्याध्यापक आडेकर सर, उपमुख्याध्यापक कांबळे सर, पर्यवेक्षिका सौ. हळदणकर यांचे मार्गदर्शन लाभले. Teacher’s Day celebrated in Guhagar College

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarTeacher's Day celebrated in Guhagar CollegeUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.