गुहागर, ता.14 : सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे झालेल्या एस. टी अपघातातील जखमीची भाजपा ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी गुहागर ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली. तेथील डॉक्टरांसोबत चर्चा केली. व जे काही सहकार्य लागेल ते भाजपा तर्फे करण्यात येईल, अशी ग्राही दिली. Jaitapkara visited the accident victims

सोमवारी सकाळी आरे नागदेवाडी येथे धोपावे चिपळूण ही एस. टी. रानवीकडे जाणाऱ्या शृंगारतळी अंजनवेल एस.टी.वर आदळली. या धडकेमध्ये दोन्ही बसमधील 41 प्रवासी जखमी झाले. या प्रवाशांना आरजीपीपीएल मेडिकल सेंटरमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी 22 प्रवाशांना ग्रामिण रुग्णालय गुहागर येथे नेण्यात आले होते. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण खरे, नगरपंचायतीमधील गटनेते उमेश भोसले, श्रद्धा घाडे, शार्दुल भावे, मंदार पालशेतकर, हेमंत बारटक्के ग्रामीण रुग्णालयात पोचले. त्यांनी सर्व रुग्णांसाठी बेड व अन्य व्यवस्था करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मदत केली. Jaitapkara visited the accident victims
अपघाताचे वृत्त कळताच भाजपचे ओबीसी मोर्चा, जिल्हाध्यक्ष. श्री संतोष जैतापकर यांनी ग्रामिण रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली. डॉ. बळवंत यांच्या बरोबर उपचारांविषयी चर्चा केली. तसेच उपचारांची अधिक गरज असलेल्या रुग्णांना अन्य ठिकाणी न्यायचे असल्य़ास सर्व प्रकारचे सहकार्य भाजपा करेल, असे आश्वासन जैतापकर यांनी दिले. Jaitapkara visited the accident victims

यावेळी गुहागर भाजपा शहर अध्यक्ष श्री संगम मोरे, गटनेते श्री उमेश भोसले, नगरसेवक श्री गजानन वेल्हाल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री संजय मालप आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. Jaitapkara visited the accident victims
