नाविन्यपूर्ण अध्यापनासाठी मायक्रोसॉफ्टतर्फे दुसऱ्यांदा निवड
गुहागर, ता. 12 : येथील हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक कै. व्हि.एस. माने यांचा मुलगा मयुरेश माने दहिवली येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तंत्रज्ञानाचा वापर करुन सुलभ पध्दतीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्सचा सहाय्याने नाविन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या या प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीने घेतली. ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ हा पुरस्कार देवून त्यांना गौरविले आहे. यापूर्वीही त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. MIE EXPERT Award to Mane

मुळचे गुहागरचे असलेले मयुरेश माने हे चिपळूण तालुक्यातील दहिवली बु.।। येथील रत्नाकर शिक्षण संस्था संचलित रत्नसागर इंग्लिश स्कूल येथे माहिती तंत्रज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर माध्यमिक तंत्रस्नेही समुह महाराष्ट्र (TSTSMAHARASHTRA) चे सक्रीय सदस्य आहेत. या समुहाद्वारे तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपला विषय कसा शिकवावा याबद्दल नाविन्यपूर्ण प्रयोग केले जातात. हे प्रयोग भारतासह परदेशातील शिक्षकांना ऑनलाईन पध्दतीने शिकवले जातात. त्यांनी मायक्रोसॉफ्टच्या विविध टूल्स बरोबर Flip, WAKALET, चा वापर करून अध्यापन रंजक केले. 2021 मध्ये विद्यार्थ्यांना सोबत घेवून Rise UP 4 E Waste (इ कचऱ्यांचे पर्यावरणपुरक विघटन) हा प्रकल्प बनवला. मायक्रोसॉफ्टने आयोजीत केलेल्या स्पर्धेत महाराष्ट्रातील १७ शाळा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील फक्त 3 शाळांनी सहभाग घेतला. यामध्ये मयुरेश माने यांच्या प्रकल्पाला जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी यावर्षी मयुरेश माने ROAD TO RECOVERY या प्रकल्पावर काम करत आहेत. MIE EXPERT Award to Mane

अशा पध्दतीने अध्यापनात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शिक्षण पद्धतीला नव्याने वेगळे आयाम देणाऱ्या मयुरेश माने यांच्या प्रयोगांची दखल मायक्रोसॉफ्टने घेतली. त्यांना ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेंटीव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्काराने गौरविले. त्याबद्दल रत्नाकर शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरीता घाग, सचिव हेमकिरण घाग, संचालक, शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पांडुरंग भंडारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मयूरेश मानेचे अभिनंदन केले आहे. MIE EXPERT Award to Mane
