• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरात बाप्पाला भक्तीभावाने निरोप

by Ganesh Dhanawade
September 10, 2022
in Guhagar
16 0
0
Farewell to Bappa in Guhagar
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर, ता.10 : गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला…अशा जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात बारा दिवसांच्या गणपती बाप्पांना गुहागर तालुक्यात भक्तीभावात निरोप देण्यात आला. तालुक्यात दहा हजारहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले. Farewell to Bappa in Guhagar

गेली 10 दिवस तालुक्यातील प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. घरोघरी मंगलमय वातावरणात बाप्पाची पूजाअर्चा सुरू झाली. शुक्रवारी दुपारनंतर बारा दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यास सुरुवात झाली. अतिशय शांततेत गणपती बाप्पाचे सायंकाळी विसर्जन स्थळी आगमन होत होते. त्याठिकाणी गणपती बाप्पाची पूजाअर्चा आणि आरती करून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येत होते. नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये तर काही ठिकाणी समुद्रकिनारी बाप्पाचे टाळ मृदुंगाच्या गजरात, तर काहींनी गणपती बाप्पा मोरया…जयघोष करत विसर्जन केले. विसर्जनावेळी पावसाचे सावट असल्याने दुपारनंतर अनेकांनी गणपती विसर्जनासाठी बाहेर काढले होते. Farewell to Bappa in Guhagar

Farewell to Bappa in Guhagar

विसर्जन ठिकाणी गुहागर पोलिसांनी खबरदारी घेतली होती. गुहागरात भर पावसात मोठ्या भक्तीभावाने गणरायाचे विसर्जन करण्यात येत होते. दरवर्षीप्रमाणे गुहागर समुद्र किनारी नगरपंचायतीने चोख व्यवस्था ठेवली होती. विसर्जनावेळी दुर्घटना घडू नये म्हणून कर्मचारी किनाऱ्यावर तैनात होते. तसेच बाप्पाच्या फुलारांसाठी ठिकठिकाणी निर्मळ कलश ठेवण्यात आले होते. Farewell to Bappa in Guhagar

Tags: Farewell to Bappa in GuhagarGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.