गुहागर, ता.10 : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कौंढर काळसुर शाखेच्या वतीने गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार करण्यात आला. सदरचा कार्यक्रम कौंढर काळसुर येथील सचिन जोयशी यांच्या निवासस्थानी करण्यात आला. Village visit on behalf of MNS


आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी व तालुका अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी तालुक्यात गाव भेट दौरा सुरू केला आहे. प्रत्येक गावात त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. तालुक्यातील युवा पिढी मनसेकडे आकर्षित होत आहे. Village visit on behalf of MNS
कौंढर काळसुर येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना प्रमोद गांधी म्हणाले की, मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या विचाराना प्रेरित होऊन अनेक तरुण मनसे पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत. आगामी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाच्या आदेशाचे पालन करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, परंतु सर्व कार्यकर्त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार उभा करून तो उमेदवार जिंकावा यासाठी सर्वांनी आतापासूनच तयारी करा. ग्रामपंचायत निवडणुकीत सुध्दा सर्वच्या सर्व जागावर उमेदवार उभा करावा, असे सांगितले. Village visit on behalf of MNS


या कार्यक्रमासाठी गुहागर तालुका अध्यक्ष विनोंद जानवळकर,कौंढर काळसुर शाखा अध्यक्ष समीर जोयशी, सागर शिरगावकर, विक्रम जोयशी, विशाल जोयशी, महेश जोयशी, सचिन जोयशी, मनोहर जोयशी, ऊत्तम जोयशी, प्रशांत भेकरे, मंगेश भेकरे , योगेश भेकरे, मंदार कदम, ओंकार कदम, गणेश भेकरे, सुयोग कुंबाडे, अजित कदम, तेजस फोफळे, विवेक शिर्के,विकास जोयशी, सचिन पारदले, नितीन जोयशी, समीर जोयशी, प्रकाश पवार , प्रकाश वीर, सुनील मुकणाक, समीर जोयशी, मोहन जोयशी,विश्वास जोयशी, तुषार जोयशी,सागर जोयशी, मंगेश वीर, तुकाराम जोयशी, विनेश तांबे, निलेश तांबे, महेश जोयशी, अरविंद जोयशी, विजय जोयशी आदी मान्यवर उपस्थित होते. Village visit on behalf of MNS