• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भक्तिभावाने गुहागरात गौरी गणपतींचे विसर्जन

by Ganesh Dhanawade
September 6, 2022
in Guhagar
17 0
0
Immersion of Gauri Ganapati in Guhagar
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

टाळ मृदुंगानी निघाल्या मिरवणूका

गुहागर ता. 06 : गुहागर तालुक्यात पाच दिवसांच्या गौरी – गणरायाचे मोठ्या भक्तिभावाने विविध समुद्र किनारी गणपती बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या.. च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. संपूर्ण तालुक्यात सायंकाळी उशिरापर्यंत शांततेत विसर्जन करण्यात आले. सगळीकडे चोक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. Immersion of Gauri Ganapati in Guhagar

गुहागर तालुक्यात दरवर्षी गणेशोत्सव सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाची मिरवणूक न काढता विसर्जन करण्यात आले होते. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट गेल्याने कोणतेही बंधन नसल्याने गणेश भक्त मोठ्या उत्साहाने गणेश साजरा करताना दिसत आहेत. Immersion of Gauri Ganapati in Guhagar

गेले पाच दिवस तालुक्यातील प्रत्येक घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्यामुळे तालुक्यात गेली काही दिवस भजन, जाकडी नृत्य व अन्य कार्यक्रमाने वातावरण भक्तीमय झाले होते. पाच दिवसांच्या गणपतींचे व गौराईचे गुहागरमधील खालचापाट, गुरववाडी, वरचापाट, बाग, आदि भागातून तसेच तालुक्यातील आरे, असगोली, वेलदूर, अंजनवेल, धोपावे, पालशेत, वेळणेश्वर, साखरी आगर, नरवण, तवसाळ या समुद्र किनाऱ्यावर तर कोतळूक, गिमवी, आबलोली, तळवली, वडद, देवघर, झोंबडी याठिकाणी नागरिकांनी नद्या नाल्यामध्ये बाप्पाचे टाळ मृदुंगाच्या गजरात,  गणपती बाप्पा मोरया…जयघोष करत विसर्जन केले. Immersion of Gauri Ganapati in Guhagar

Immersion of Gauri Ganapati in Guhagar

गुहागर खालचापाट येथील गोयथळे मंडळीनी पारंपारिक पद्धतीने गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहात केले. गोयथळे मंडळी हे गेले अनेक वर्ष पारंपारिक पद्धतीनेच म्हणजे टाळ मृदुंगाच्या वाद्याने गौरी गणपतीचे विसर्जन करत असतात. नमो देवराया, लहरी राजा प्रजा आंधळी, पाई हळूहळू चाला… अशी भक्तीमय भजने गात गौरी गणपतीचे विसर्जन मोठ्या उत्साहाने पार पाडले. विसर्जनावेळी पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. Immersion of Gauri Ganapati in Guhagar

Immersion of Gauri Ganapati in Guhagar

गुहागर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून गुहागर पोलीस स्थानकाने खबरदारी घेतली होती. गुहागर समुद्र किनारी नगरपंचायतीने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवले होते. तसेच विसर्जनाचेवेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून समुद्रकिनाऱ्यावर कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली होती. त्यांच्याकडे लांब दोरखंड, शिट्टी आणि लाईफ जॅकेट देण्यात आली होती.  विसर्जनाला आपले कर्मचारी किनारी ठेवले होते. Immersion of Gauri Ganapati in Guhagar

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiImmersion of Gauri Ganapati in GuhagarLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.