• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट पाहण्यासाठी सायकल फेरी

by Mayuresh Patnakar
September 5, 2022
in Guhagar
16 0
1
Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav
32
SHARES
91
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 05 : दापोली परिसरात अनेक ठिकाणी गणेशोत्सव निमित्त वसुंधरा संरक्षण, इतर प्रबोधनात्मक संदेश देणारे चलतचित्र देखावे व पर्यावरणपूरक साहित्य वापरुन सजावट केली आहे. हे देखावे, सजावट पाहण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार ४ सप्टेंबर २०२२ रोजी सायकल फेरी काढून जनजागृती करण्यात आली. Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

८ किमी अंतराची ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली येथून सकाळी ७:३० वाजता सुरु झाली. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सायकल चालवत सहभागी झाले होते. गणपती बाप्पाचा जयघोष करत दापोली परिसरातील काही सार्वजनिक आणि घरगुती गणपती सजावट देखावे पाहण्यात आले. ओम साईराम मित्र मंडळ आयोजित दापोलीचा राजा येथे गडकिल्ले रक्षण संवर्धन संदेश देणारा देखावा पाहिला. तसेच बाल गणेश मित्र मंडळ, श्री मानाचा गणपती, व्यापारी मित्र मंडळ नवसाचा राजा इत्यादी ठिकाणी दर्शन घेतले, सजावट पाहिली. कल्पेश रेळेकर यांनी स्वच्छ्ता, वृक्षतोड, उत्खनन, पाणी अडवा पाणी जिरवा या दृष्यातून वसुंधरेचे संरक्षण करणेचा संदेश देणारा देखावा साकारला आहे.

Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

हसमुख पांगारकर यांनी टाकावू साहित्य वापरुन ऐतिहासिक देखावा साकारला आहे. विजय रेमजे यांनी समुद्रमंथन याद्वारे चालू घडामोडी व पर्यावरण रक्षण संदेश देणारा देखावा तयार केला आहे. महेश राळे लालबाग यांनी बारा ज्योतिर्लिंग देखावा उभारला आहे. हे चलचित्र देखावे, त्यातील संदेश, इतिहास, गोष्टी, सजावट करण्यासाठी वापरलेले साहित्य याबद्दलची माहिती सर्वांनी जाणून घेतली. नवीन माहिती समजल्यामुळे सर्वजण खुश झाले. Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

सायकल फेरीचे ठिकठिकाणी स्वागत झाले, पाहुणचार आणि प्रसाद मिळाला. सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने सर्वांसाठी दापोली सायकलिंग क्लबमार्फत विनामूल्यपणे सायकल फेरीचे आयोजन केले जाते. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात संदीप भाटकर, सुरज शेठ, वरुण महाजन, सुनील रिसबूड, पराग केळस्कर, केतन पालवणकर, सुधीर चव्हाण, सर्वेश बागकर, सुरज भुवड इत्यादींनी मोलाची भूमिका बजावली. दैनंदिन जीवनात सायकलचा वापर अधिक करा आणि इतरांनाही प्रेरित करा, असे आव्हानही आयोजकांनी केले आहे. Cycle tour to see eco-friendly Ganeshotsav

Tags: Cycle tour to see eco-friendly GaneshotsavGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.