कुणीही शिंदे गटात जाणार नाही ; तालुकाप्रमुख सचिन बाईत यांचा विश्वास
गुहागर ता. 05 : गुहागर तालुक्यात आ. भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण तालुका एकसंघ आहे. आ. जाधव यांनी तालुक्यात केलेल्या विकासकामांमुळे अन्य पक्षातील कार्यकर्तेही प्रभावीत झाले आहेत. सेनेचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांची मजबूत एकजूट असून तालुक्यातील एकही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नसल्याचा निर्वाळा सेनेचे गुहागर तालुका प्रमुख सचिन बाईत यांनी दिला आहे. Under the leadership of Shiv Sena Jadhav


आ. भास्कर जाधव यांची शिवसेना नेते पदी नियुक्ती झाल्यानंतर गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांत आणखीन बळ वाढले आहे. असे सांगून सचिन बाईत म्हणाले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव साहेब ठाकरे यांनी योग्य व अचूक निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणूकांना अजून वेळ आहे. परंतू आमदार साहेबांनी त्या पूर्वीच सर्व जिल्हा परिषद गटात मेळावे घेऊन सेनेची गुहागर तालुक्यात मजबूत बांधणी केली आहे. विकासकामे करताना त्यांनी कधीही पक्ष व समाज पाहिला नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण या बरोबरच प्रत्येक गावातील आवश्यक गरजा ओळखून त्यांनी त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे त्यांच्या कामावर इतर पक्षातील कार्यकर्तेही प्रभावीत होत आहेत. साहेबांनी तालुक्यातील वाडीवस्तीवर भेट देऊन संपर्क ठेवला आहे. Under the leadership of Shiv Sena Jadhav
कोविड काळात गुहागरच्या चाकरमान्यांना त्यांनी दिलेला दिलासा व धीर कोणीही विसरलेले नाही. म्हणूनच तालुक्यात सोडाच परंतू आमदारांच्या मुंबईतल्या सभेसाठी व त्यांना भेटण्यासाठी शेकडो कार्यकर्ते गर्दी करताना दिसत आहेत. आ. भास्कर जाधव यांचा कामाचा आवाका मोठा आहे. म्हणूनच त्यांना सेनेच्या नेतेपदी नेमण्यात आले आहे. त्या पदाला ते योग्य असून ते त्यांनी यापूर्वीच सिद्ध केले आहे. Under the leadership of Shiv Sena Jadhav


श्री. सचिन बाईत पुढे म्हणाले की, गुहागर तालुक्यातील सर्व पं. स. व जि. प. सदस्य यांनी उत्कृष्ट काम केले असून आगामी काळात ग्रामपंचायत व जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर शिवसेनेचे वर्चस्व दिसेल यात शंका नाही. आ. भास्कर जाधव हे गुहागर तालुक्याचे सर्वमान्य नेतृत्व असून त्यांना सद्यातरी पर्याय नाही असे सांगून श्री. बाईत म्हणाले की सर्व पदाधिकारी यांच्या जवळ त्यांचे घरोब्याचे संबंध असून त्यांच्या जवळ चांगला संवाद आहे. त्यामुळे कोणीही कार्यकर्ता शिंदे गटात जाणार नाही, असा विश्वासही सचिन बाईत यांनी व्यवत्त केला आहे. Under the leadership of Shiv Sena Jadhav