ढेरे हॉस्पिटलमध्ये अस्थिरोग उपचार रोज ३ ते ५ व नेत्र तपासणीस दर बुधवार ३ ते ५ वेळेत
गुहागर ता. 01: गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर गुहागर शहरच नव्हे तर तालुक्यातील रूग्णांना चांगली वैद्यकीय सेवा देणाऱ्या शहरातील ढेरे हॉस्पिटलमध्ये 24 तास डिजिटल एक्स-रे व रक्त तपासणी संकलन सेंटर सुरू करण्यात आले. गुहागर डायग्नोस्टिक सेंटर या नावाने सुरू झालेल्या या सेवेचे उद्घाटन भूलतज्ञ डॉ. सुभाष जवळगीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय सेवेबरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. X-ray and blood test center at Guhagar


गुहागर डायग्नोस्टिक सेंटर या नावाने सुरू झालेली ही सेवा 24 तास असून तज्ञांचे रिपोर्टसह असणार आहे. सध्या हॉस्पिटलमध्ये जनरल मेडिसिन व लहान मुलांचे डॉक्टर 24 तास कार्यरत आहेत. त्याचबरोबर रुग्णसेवेत वाढ म्हणून हॉस्पिटलमध्ये गणेश चतुर्थी पासून अस्थिरोग (सांधे व हाडांचे) उपचार दररोज दुपारी ३ ते ५ व नेत्र तपासणीस दर बुधवार ३ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहे. तसेच हॉस्पिटलमध्ये महिला व पुरूर्षांसाठी स्वतंत्र वार्डची व्यवस्था आहे. X-ray and blood test center at Guhagar


यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ. नितीन जाधव, स्त्री रोगतज्ञ डॉ. सुरेश भाले, डॉ. स्वप्नाली भाले, डॉ. बाळासाहेब ढेरे, डॉ. निलेश ढेरे, बाल रोगतज्ञ डॉ. साशंक ढेरे, डॉ. गीतांजली ढेरे, डॉ. तन्वी ढेरे, डॉ. मंदार आठवले आदी उपस्थित होते. X-ray and blood test center at Guhagar

