लुप्त होणाऱ्या कलांच्या संवर्धनासाठी ‘मसाप’ चिपळूण तर्फे आयोजन
गुहागर, ता.30 : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. या स्पर्धेतील पहिल्या पाच आणि उत्तेजनार्थ दहा लोककलाकारांचा भव्य बक्षिसांनी सन्मान केला जाणार आहे. अधिक माहितीसाठी मो. ९४२२३९५६६८, ९४२३२९१४८५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील लोककलावंताना सन्मान मिळवून देणे, संघटन करणे, शासकीय पातळीवर दखल घेतली जावी, यासाठी प्रयत्न करणे, लोककलाकारांचा परस्पर परिचय आणि संघटन निर्माण करणे, काळाच्या ओघात लुप्त होत चाललेले लोककलेचे शिल्लक धन जपण्यासाठी, संवर्धनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (Maharashtra Sahitya Parishad) चिपळूण शाखेने भव्य ‘लोकगीते व लोककला’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. Folk Songs and Folk Art Competitions
लोककलेच्या समृद्ध वारशाची जपणूक करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नमन, भारुड, जाखडी, गोमू, काटखेळ, संकासूर, भजन, डेरा, कव्वाली, जलसा, गज्जो, कातकरी, आदिवासी, लोककला यासोबत जुनी सांस्कृतिक गीते, शेती गीते, भलरी गीते, लग्नगीते, होळीगीते, बारसागीते (सुहेर गीते), विधी गीते, डाक गीते, मुस्लीम विधी गीते, मुस्लीम विवाह गीते या व अशा इतर काळाच्या पडद्याआड चाललेल्या लोकगीते, लोककला, लोककथा, विधीकथा आणि सांस्कृतिक ठेवा यांचे संकलन व संवर्धन होण्याच्या दृष्टीने चिपळूण मसापने ह्या स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जाती-धर्माची व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धेतील प्रकार हा अस्सल पारंपारिक असणे अपेक्षित आहे. स्पर्धकाने त्याची लिखित संहिता पाठवणे बंधनकारक आहे. स्पर्धकाने उत्तमोत्तम पारंपारिक लोकगीते, लोककला, पारंपारिक सांस्कृतिक खेळ, संस्कृतीदर्शक कोणताही पारंपारिक रूढ प्रकार मोबाईल किंवा कॅमेऱ्याने शूटिंग करून या स्पर्धेसाठी पाठवायचा आहे. Folk Songs and Folk Art Competitions

या स्पर्धेच्या पुरस्कारांचे स्वरूप
पहिला क्रमांक – २१,०००/- रोख, दुसरा क्रमांक – १५,०००/- तीसरा क्रमांक – ११,०००/- चौथा क्रमांक – ७,५००/- पाचवा क्रमांक – ५,०००/- उत्तेजनार्थ १० बक्षिसे – प्रत्येकी १,१११/- रोख, आणि प्रत्येक क्रमांकाला सन्मान चिन्ह, सन्मानपत्र आणि पुस्तके, हापूस आंब्याचे कलम, तसेच पहिल्या ५० स्पर्धकांना हापूस आंबा कलम भेट देण्यात येणार आहे. एक व्यक्ती कितीही प्रवेशिका पाठवू शकते. स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नाही. जिल्ह्याच्या सांस्कृतिक ठेव्याचे संकलन होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा अतिशय महत्त्वाची आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची अंतिम मुदत १ नोव्हेंबर २०२२ पर्यंत आहे. Folk Songs and Folk Art Competitions
स्पर्धेतील गीत, कला, खेळ, रूढ प्रकार हे अस्सल पारंपारिकच असावेत. त्याची चाल, प्रकार, शब्द योजना, मांडणी कोणतेही आधुनिक संस्कार न करता मूळ जुन्या रूपातच असावी. व्हिडीओचा/कलेच्या प्रकाराचा कालावधी किती असावा याबद्दलचे स्वातंत्र्य व्हिडीओ बनविणाऱ्याला आहे. एखादा कलाप्रकार किती वेळात सर्वंकष पध्दतीने समोरच्या पर्यंत पोहचू शकेल याचा अंदाज घेऊन व्हिडीओचा कलावधी/वेळ ठरवावा. मात्र शक्यतो व्हिडीओ खूप मोठा होणार नाही. याचीही काळजी व्हिडीओ बनविणाऱ्याने घ्यावी. शुटिंग मुद्दाम तयार केलेले किंवा प्रत्यक्षात कार्यक्रम सादर होत असताना केलेले किंवा पूर्वीही केलेले असले तरी चालू शकते. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटातील, कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती सहभागी होऊ शकते. स्पर्धक वरील नमूद कला प्रकाराशिवाय कोणत्याही जातीधर्मातील इतर कोणताही लोककला प्रकार किंवा विस्मृतीत गेलेला कलाप्रकार सादर करू शकतो. Folk Songs and Folk Art Competitions
मोबाईलवर व्हिडीओ बनवताना मोबाईल आडवा ठेऊन व्हिडीओ बनविणे आवश्यक आहे. ऑडिओ रेकॉर्डिंग (फक्त आवाज) साठीही स्पर्धक स्पर्धेत भाग घेवू शकतो. अर्थात वाद्य आणि लाईव्ह अॅक्शन यांना अधिकचे वेगळे गुण स्पर्धेत असणार आहेत. व्यावसायिक ग्रुपनी स्पर्धेत सहभागी होताना पारंपारिकता जपली जाईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे. बोल नीट कळावेत यासाठी गीत/गाणे/कला प्रकार व्यवस्थित लिहून पाठवणे (लिखित संहिता) आवश्यक आहे. व्हिडीओ सोबतच लिखित संहिता फोटो काढून किंवा टाईप करून पाठवावी. संहितेमध्ये अगदी थोडक्यात गीताचा आशय किंवा गाण्याची लौकिक कथा लिहून पाठवावी. तसेच गाण्यांमध्ये काही स्थानिक किंवा पारंपारिक जुने शब्द आले असतील तर त्या शब्दांचा अर्थ शेवटी नमूद करावा. तसेच काही गीते ही रेकॉर्ड करणे किंवा चित्रित करणे शक्य न झाल्यास, ती फक्त लिखित स्वरूपात पाठवली तरी चालू शकतील. संहितेच्या शेवटी स्पर्धकाचे नाव, मोबाईल क्रमांक, पत्ता यांचा स्पष्ट उल्लेख असावा. Folk Songs and Folk Art Competitions

ही स्पर्धा रत्नागिरी जिल्हास्तरीय असली तरी जिल्ह्याबाहेर राहाणारा कोणीही मूळ रत्नागिरीकर या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. अशांनी आपल्या गावाचा स्पष्ट उल्लेख प्रवेशपत्रात करावा. या अभिनव स्पर्धेतून अंधश्रद्धांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही. मात्र भूतं, भगत, बाया, देवाचा नवस, अशुभ कार्याचे विधी यामध्येही गाण्यांची सांस्कृतिक ठेव आहे. स्पर्धेच्या दृष्टीने हा ठेवा देखील महत्वाचा मानला जाणार आहे. स्पर्धात्मक निकष हे लोककला प्रकार, चित्रिकरण, वाद्य, लिखित संहिता, सादरीकरण, दुर्मिळता याआधारे दिले जातील. Folk Songs and Folk Art Competitions
स्पर्धेचा निकाल आणि पुरस्कार वितरण सोहळा चिपळूण येथे होणाऱ्या ‘भव्य लोककला महोत्सवात’ संपन्न होईल. त्यावेळी यशस्वी कलावंतांना सादरीकरण करण्याची संधी मिळणार असल्याचे स्पर्धेचे समन्वयक आणि इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे, स्पर्धा संकल्पक आणि भाषा अभ्यासक, समीक्षक अरुण इंगवले, स्पर्धा संयोजक प्रा. संतोष गोनबरे यांनी कळविले आहे. व्हिडीओ साईज मोठी झाल्यास aparant.msp@gmail.com या ई-मेल गुगल ड्राईव्हवर शेअर करावा. किंवा शक्य पेन ड्राईव्ह मधून स्पर्धा संयोजकांकडे जमा करावा. अधिक माहितीसाठी मो. ९४२२३९५६६८, ९४२३२९१४८५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Folk Songs and Folk Art Competitions
