रत्नागिरी, ता.30 : राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय, आंबव येथे 55 व्या युवा महोत्सव विभागीय फेरी पार पडली. या फेरीत रत्नागिरी उपकेंद्राच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. यामध्ये उपपरिसरातील 32 विद्यार्थ्यांनी 19 विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. Success of Ratnagiri sub-centre

या फेरीमध्ये वेस्टर्न व्होकल सोलो प्रकारात तन्मय चव्हाण याने प्रथम क्रमांक पटकावला, तर कोलाज मध्ये द्वितीय टीना हीर्लोस्कर, वक्तृत्व मध्ये तृतीय वेदराज गोसावी, एकपात्री अभिनयामध्ये तृतीय साक्षी चाळके, कथाकथन उत्तेजनार्थ साक्षी चाळके असे क्रमांक प्राप्त केले आहेत. यासाठी शिक्षक समन्वयक म्हणून प्राध्यापिका आरती दामले यांनी काम पाहिले. Success of Ratnagiri sub-centre

यासाठी उपपरिसराचे सहाय्यक कुलसचिव अभिनंदन बोरगावे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सांस्कृतिक विभागाचे समन्वयक श्री. निलेश रोकडे तसेच उप परिसराचे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. आणि पुढील फेरीसाठी शुभेच्छा दिल्या. Success of Ratnagiri sub-centre
