महागाईचा फटका ; गणेश मूर्तींच्या किंमती स्थिर
गुहागर, ता. 29 : गुहागर तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून मूर्ती शाळा आहेत. सद्या बहुतेक मूर्ती या पीओपीच्या असून मूर्तीकार या मूर्ती पेण वरून मागवतात. त्यावर पुन्हा हात मारून रंगकाम केले जाते. वेळंब येथील मूर्तीकार सुनिल गुहागरकर यांची तिसरी पिढी आज या मूर्तीकला व्यवसायात काम करत आहे. त्यांनी हा व्यवसाय कला म्हणून जोपासला आहे. पीओपी मूर्तींच्या किंमती वाढल्या आहेत. कामगारांची मजुरी व माती, रंगाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतू या सर्व महागाईचा मूर्तीच्या किंमतीवर फारसा परिणाम झालेला नाही. असे गुहागरकर म्हणाले. Ganesh idol pricey stable


यावर्षी देखावे करण्यासोबतच शिवाजी महाराज काळातील ऐतिहासिक पोशाख व त्या संबंधी चित्रांना महत्व देण्यात आले आहे. गुहागर तालुक्यात १४४८० घरगुती गणपती विराजमान होणार आहेत. तालुक्यात फक्त दोनच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून ही मंडळे शृंगारतळीची आहेत. काही जणांचा दिड दिवसाचा, काहींचा पाच दिवसांचा तर काही अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती ठेवतात. या काळात महिला तसेच पुरुष मंडळींचे भजनाचे व विविध नाचाच्या स्पर्धा तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घरोघरी होत असतात. हा उत्सव मोठ्या जल्लोषात व आनंदात साजरा करण्यात येतो. Ganesh idol pricey stable


या वर्षीचा गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वांनाच गणेश उत्सवाचे वेध लागले आहेत. यावर्षी प्रचंड संख्येने पुणे मुंबईकडून मोठ्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होत आहेत. याकरिता राज्य परिवहन व खाजगी गाड्या, ट्रॅव्हल्स यापूर्वीच बुक झाल्या आहेत. दोन वर्षानंतर निर्बंध मुक्त झालेला हा सण साजरा करण्यासाठी सर्वजण तयारीत आहेत. त्यामुळे पुढील आठ दिवस तरी गाव वाडीवस्ती गजबजलेली असणार आहे.. कोकणातील प्रत्येक घरात गणपतीचे आगमन होते. जे कुटुंब उद्योग व्यवसाय किंवा नोकरी निमित्तान गावचे घर बंद करून परगावी राहातात. ती सर्वजणे घरे उघडून घरात गणपतीची स्थापना करतात. Ganesh idol pricey stable