गुहागर, ता. 29 : तालुक्यातील शेतकरी आणि बागायतदारांना उत्तम प्रतिचे सेंद्रिय खताचा पुरवठा करण्यात असगोली वरवेली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने पुढाकार घेतला आहे. या वर्षात 60 टन खताची विक्री या संस्थेने केली आहे. Initiative for use of organic manure


या उपक्रमाविषयी माहिती देताना असगोली वरवेली विकास संस्थेचे अध्यक्ष अरविंद विचारे म्हणाले की, कोकणातील विविध विकास संस्था आजही अनुदानित खतांची विक्री करतात. आता शेतकरी आणि बागायतदारांमध्ये सेंद्रीय खतांबाबत जागृती होत आहे. पण ही खते कमी दरात कुठे मिळतील असा प्रश्र्न असतो. ही उणिव लक्षात घेवून आमच्या सोसायटीने सेंद्रीय खत विक्री करण्याचा निर्णय घेतला. 5 टन खत विक्रीपासून सुरवात केली. आज तालुक्यातील अनेक आंबा बागायदार आमच्या सोसायटीतून सेंद्रीय खत घेवून जातात. यावषी खरेदी केलेले 60 टन सेंद्रिय खत संपले आहे. अजुनही खताच्या नोंदणीसाठी बागायतदार फोन करत आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात खत आणण्याचाही विचार आम्ही करत आहोत. आमच्या या उपक्रमामुळे रासायनिक खते वापरण्याचे प्रमाणही घटले आहे. आता सोसायटीमार्फत केवळ 15 टन रासायनिक खताचे वितरण होते. हे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी सोसायटीमार्फत जनजागृती सुरु आहे. सेंद्रिय खतामुळे मातीचा कस वाढतो. उत्पादन वाढते. हे शेतकऱ्यांच्याही लक्षात येवू लागले आहे. Initiative for use of organic manure

