वेळणेश्वर जि. प. शाळा नं.१ मध्ये निवड
गुहागर, ता. 27 : तालुक्यातील वेळणेश्वर येथील जि. प. शाळा नं.१ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी माजी उपसरपंच, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी, नमन प्रेमि, तरुणांचे आधार श्री संदीप गावणंग यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते आणि पालक श्री वैभव ठाकूर यांची एकमताने निवड करण्यात आली. या सभेला १०६ पालक उपस्थित होते. Selection of Teacher Parent Union

नुकतीच वेळणेश्वर जि प शाळा नं.१ मध्ये शाळेतील शिक्षक व पालक यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला १०६ पालक उपस्थित होते. तालुक्यात जास्त विद्यार्थी पटसंख्या असलेली वेळणेश्वर जि प हि एक मेव शाळा असून या शाळेत २९९ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर १० शिक्षक शिकवीत आहेत. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या श्री संदीप गावणंग व उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या वैभव ठाकूर यांच्या निवडीने पालकांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक प्यारेलाल शंभू मोते व सर्व शिक्षक, पालक सदस्य यांनी त्यांचा सत्कार केला, व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. या आधी अमोल जामसुतकर हे अध्यक्ष होते. Selection of Teacher Parent Union

यावेळी बोलताना संदीप गावणंग यांनी सांगितले की, शाळेतील अडीअडचणी, समस्या सोडविण्यासाठी तसेच शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शिक्षक, पालक व ग्रामस्थ कमिटी सदस्य यांना सोबत घेऊन प्रयत्न करणार आहे. शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. तसेच शाळेमध्ये नवीन उपक्रम राबविण्याबाबत प्रयत्न करणार आहे, असेही त्यांनी शेवटी सांगितले. Selection of Teacher Parent Union
