गुहागर, ता. 24 : निरनिराळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीमध्ये नुकतेच रानभाज्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. Exhibition of wild vegetables at Sringaratali


पावसाळी ऋतूमध्ये निसर्गामध्ये विविध प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध होतात. याचेच औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांचे महत्त्व व आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी. या उद्देशाने रिगल कॉलेजकडून प्रदर्शन भरविण्यात आले होते. रिगल कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या रानभाज्यांपासून नाविन्यपूर्ण व चविष्ट अशा पाककृती बनविल्या होत्या. यामध्ये रानभाज्यांपासून थालीपीठे, पकोडे, अळूवडी यांसारख्या रेसिपींचा समावेश होता. प्रदर्शनादरम्यान विद्यार्थ्यांनी प्रत्येक रानभाजीचे फायदे सांगितले. Exhibition of wild vegetables at Sringaratali


रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के यांनी यावेळी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली. यामध्ये प्रथम क्रमांक कु. मृणाली भावे, द्वितीय क्रमांक कु. सानिका शिर्के, तृतीय क्रमांक कु. भूमिका आंबेकर व कु.सौजन्या पवार यांना विभागून देण्यात आला. यावेळी रिगल कॉलेजचे सर्व विद्यार्थी, शिक्षक वर्ग या प्रदर्शनासाठी उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री.संजयराव शिर्के, संचालिका डॉ. सौ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रदर्शन पार पडले. Exhibition of wild vegetables at Sringaratali