• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
28 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियान

by Ganesh Dhanawade
August 24, 2022
in Ratnagiri
16 0
0
Clean Sea Coast Mission
31
SHARES
89
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे

रत्नागिरी, ता. 24  :  कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जिल्हा प्रशासनासह 90 सामाजिक, धार्मिक संस्थांचे पंधरा हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. प्लास्टिक व पॉलिथिन मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. याकरिता नियोजन करण्यात येत आहे. यासाठी गावागावांमध्ये भेटी दिल्या जात असल्याची माहिती सीमा जागरण मंचाचे (दिल्ली) अखिल भारतीय सहसंयोजक मुरलीधर भिंडा यांनी पत्रकार परिषदेत दिली. Clean Sea Coast Mission

पत्रकार परिषदेला सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी, उत्तर रत्नागिरी संयोजक अमर पावशे, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक स्वप्नील सावंत आणि डॉ. प्रशांत अंडगे उपस्थित होते. नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. या वेळी जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त या अभियानाचे आयोजन केले आहे. याच महिन्यात घरोघरी तिरंगा हा उपक्रम देशभरात यशस्वी झाला. 17 सप्टेंबरला सर्व समाजाने एकत्रित येऊन समुद्रकिनारी स्वच्छ सागर तट अभियानात सहभागी व्हावे. कुटुंब, मित्र परिवार, सोसायटीतील रहिवासी, शाळा, कॉलेज सर्व स्तरावर याची माहिती देण्यात येत आहे. Clean Sea Coast Mission

Clean Sea Coast Mission

प्लास्टिक, पॉलिथिन कसे वापरावे, त्याचा पुर्नवापर कसा होईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. पर्यावरणाचा होणारा -हास आपण थांबविला पाहिजे. हीच काळाची गरज आहे, हे आपण ओळखावे व त्वरित जागे व्हावे. वृक्षारोपण करावे हे अत्यंत गरजेचे आहे. Clean Sea Coast Mission

पर्यावरणाचा संतुलन आपण सांभाळला पाहिजे, याकरिता नियोजन करण्यात आल्याचे श्री. भिंडा यांनी सांगितले. सामाजिक संस्था, सरकारी संस्था, सागर तट सुरक्षा रक्षक, अग्निशामक दल, नगरपालिका, ग्रामपंचायत, पोलीस, कोस्टगार्ड, जीव रक्षक, प्लास्टिक पुन्हा वापर करणार्‍या कंपन्या, समुद्रकिनारी असलेली हॉटेल्स, समुद्रकिनारी राहणारे सर्व बांधव या सर्वांनी मिळून हे अभियान यशस्वी करूया, असे आवाहनही त्यांनी केले. Clean Sea Coast Mission

स्वच्छता राबविण्याची ठिकाणे
दक्षिण रत्नागिरीत नांदीवडे, मालगुंड, गणपतीपुळे (३ कार्यक्रम), आरे, काळबादेवी, मिर्‍या बीच, पांढरा समुद्र, मांडवी बीच, भाट्ये, कसोप, कुर्ली, वायंगणी, रनपार, गणेशगुळे, पूर्णगड, गावखडी वेत्ये, आंबोळगड, जैतापूर, साखरीनाटे येथे उत्तर रत्नागिरीत वेसवी, बाणकोट, उंबरशेत, उटंबर, आडे, लखडतर, हर्णे-पाज, लाडघर, लखडतर वाडी, बुरोंडी, दाभोळ, तरीबंदर, वेलदुर, असगोली, पालशेत, बुधल, बोर्‍या, कोंडकारूळ, वेळणेश्वर, साखरी आगर, हेदवतड, काताळे नवानगर कुडली या 50 ठिकाणी अभियान राबवण्यात येणार आहे. शपथ कार्यक्रम जयगड कासारवेली, पावस आणि कशेळी येथे आयोजित केला आहे. Clean Sea Coast Mission

Tags: Clean Sea Coast MissionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share12SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.