चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन
गुहागर, ता. 23 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर येथे 22 ऑगस्ट रोजी कान, नाक, घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी १० ते २ या वेळेत घेण्यात आले. यामध्ये 25 लाभार्थ्यांनी पूर्वनोंदणी केली होती. तर शिबीरीचा एकूण 65 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar

श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या माध्यमातून चौथा श्रावण सोमवार दि. 22/08/22 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले होते. हे शिबीर परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी १० ते २ या वेळेत घेण्यात आले. यामध्ये कान/नाक/घसा तपासणी करण्यात आली. या शिबीरासाठी उपस्थित डॉ.(मेजर) मनोहर सुर्यवंशी यांनी लाभार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती दिली. तसेच व्याडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे व संचालक केदार खरे यांनी श्री देव व्याडेश्वरचा प्रसाद डॉ. सुर्यवंशी दांपत्यांना दिला. व त्यांचा सत्कार केला. Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar

