चौथ्या श्रावण सोमवारनिमित्त व्याडेश्वर देवस्थानचे आयोजन
गुहागर, ता. 21 : श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या माध्यमातून चौथा श्रावण सोमवार दि. 22/08/22 रोजी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. हे शिबीर परशुराम सभागृह, व्याडेश्वर देवस्थान, गुहागर येथे सकाळी १० ते २ या वेळेत घेण्यात येणार आहे. यामध्ये कान/नाक/घसा तपासणी करण्यात येणार आहे. तरी तालुकावासीयांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष शार्दुल भावे यांनी केले आहे. Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar
या शिबीरासाठी कान,नाक,घसा व थायरॉइड तज्ञ् डॉ.(मेजर) मनोहर सुर्यवंशी उपस्थित राहणार आहेत. डॉ सुर्यवंशी हे MBBS (GMC Miraj), M.S ( ENT, Head & Neck Surgeon ) (INHS Asvini, Colaba Mumbai. आहेत. यांनी 5 वर्ष short service commission द्वारा मिलिटरी मध्ये काम केले आहे. व भारतीय नौसेनेच्या command हॉस्पिटलात Post graduation केले. नंतर त्यांनी उत्तर प्रदेश मधील super speciality हॉस्पिटल मध्ये साडेतीन वर्षे ENT, Head and Neck Surgery या विभागात काम केले. Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar
तरी तालुक्यातील नागरिकांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, अशी विनंती श्री देव व्याडेश्वर देवस्थान फंड, गुहागर यांच्या वतीने अध्यक्ष शार्दुल भावे यांनी केली आहे. Ear Nose Throat Checkup Camp in Guhagar