रानभाज्या विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देऊ ; तहसीलदार प्रतिभा वराळे
गुहागर, ता.16 : आरोग्याच्या दृष्टीकोनातून रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या वापराने आयुर्वेदिकदृष्ट्या चांगले परिणाम होणार आहेत. निसर्ग आपल्याला खूप काही देतो. आपल्याला ते घेता आले पाहिजे असे सांगून शेतकरी – महिला बचत गटाच्या रानभाज्या विक्री साठी जागा उपलब्ध करून देऊ, असे अभिवचन गुहागरच्या तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले. त्या रानभाजी महोत्सवाच्या उद्घाटनात बोलत होत्या. Wild vegetable festival in Sringaratali

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुका कृषी विभाग व पंचायत समिती, गुहागरच्या संयुक्त विद्यमाने पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात रानभाजी महोत्सवाचेआयोजन करण्यात आले होते. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर, पाटपन्हाळेचे सरपंच संजय पवार, सागरी त्रिशूळचे सरपंच सचिन म्हसकर, सामाजिक कार्यकर्ते गौरव वेल्हाळ, कृषी अधिकारी आर.के. धायगुडे, शृंगारतळीचे मंडळ कृषी अधिकारी भिमाशंकर कोळी, पालशेत मंडळ कृषी अधिकारी रोहन चोथे, कोतळूक मंडळ कृषी अधिकारी भक्ती यादव, गुहागर ऑर्गनिक प्रोड्युसर कंपनीचे मंदार जोशी, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या तालुका समन्वयक दुर्वा ओक, प्रगतीशील शेतकरी शिवराम भुवड आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते फित कापून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. कोकणातील द-या खो-यात, डोंगर माळरानावर रानावनात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती असतात. या वनस्पतींच्या फळ, फुले, पानांचा मनुष्याचा आहारात महत्व आहे. या सगळ्या रानभाज्यांची व या रानभाज्यांच्या पाना-फुलांपासून बनविलेल्या विविध खाण्याचे पदार्थांची ओळख व्हावी, या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत विविध महिला बचत समुहाने विविध रानभाज्यांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. Wild vegetable festival in Sringaratali
यामध्ये आम्रपाली समुह कोतळूक, श्री हरेश्र्वर समुह मळण, उन्नती ग्रामसंघ तळवली, श्रीकृष्ण समुह वेलदूर, श्री महाकाली समुह वेळंब, हिरानी समुह खामशेत, तुळजाभवानी मळण, झेप समुह परचुरी, प्रेरणा समुह कोतळूक, स्वामी समर्थ नरवण, शिवसमर्थ कोतळूक, श्री सद्गुरूकृपा कोतळूक, श्री समर्थ समुह यांनी सहभाग घेतला होता. या बचत समुहासोबतच प्रकाश सोलकर (चिखली), विश्राम माळी (वेळंब), यांनीही विविध रानभाज्यांचे व त्यापासून बनविलेल्या पदार्थांचे प्रदर्शनही लावले होते. Wild vegetable festival in Sringaratali

यावेळी प्रदर्शनात सहभागी बचत समुहांना तहसिलदार श्रीमती वराळे व मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रही देण्यात आले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक संजय सानप, विकास पिसाळ, नितीन धायगुडे, प्रभाकर जाबरे भिमाशंकर कोळी यांच्या सह मीनल भागवत, राहिला बोट, माधुरी पवार यांच्यासह सर्व कृषी सहायक यांनी परिश्रम घेतले. Wild vegetable festival in Sringaratali
