गुहागर, ता.16 : तालुक्यातील साखरीआगर येथील कातळवाडी सभागृहात जागतिक जैव इंधन दिवस (बायो फ्युल डे) उत्साहात साजरा करण्यात आला. एमसीएलचे प्राईम बीडीए आणि श्रमसाफल्य ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी गुहागर व झोलाई अॕग्रो ऑरगॅनिक प्रोड्यूसर कंपनी चिपळूण या कंपन्यांचे संचालक श्रीकांत करजावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. World Fuel Day at Sakhari Agar


यावेळी गुहागर तालुका प्रतिनिधींच्या हस्ते मिसाईल मॕन डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर चिपळूण व गुहागर अॕडमीन प्रमूख श्री. सचिन मोहीते यांनी जैविक इंधन (बायो फ्युल डे) विषयी मौलिक माहिती दिली. तर संजय भागवत यांनी कंपनीची वाटचालीस व पुढील विधायक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. World Fuel Day at Sakhari Agar
एमसीएल कंपनीच्या इंधन क्रांतीच्या व्हिजन मिशन नुसार आपल्या गावामध्ये, तालुक्यामध्ये उत्कृष्ठ काम करणा-या शिलेदारांना गुहागर देवभूमी क्लिन फ्यूल प्रा. लि. चे संचालक आणि एमसीएल सिनियर बीडीए दिनेश कासेकर यांचे हस्ते एमसीएल वॉरीयर प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी एमसीएल कंपनीच्या चळवळीमध्ये चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील तमाम जनतेने उत्सफूर्तेपणे सहभागी होऊन स्वत:च्या उन्नती सोबतच आपल्या तालुक्याच्या विकासाला सहकार्य करावे, असे आवाहन गुहागर टिमने केले. World Fuel Day at Sakhari Agar


यावेळी गुहागर व चिपळूण टिमचे संदिप गोरीवले, संतोष घुमे, संतोष दवंडे, केंद्र चालक प्रकाश दवंडे, नितीन कनगुटकर, शिद्धेश मोरे, प्रभाकर धावडे, सुरेश कदम, बीडीए केतन दवंडे आदी उपस्थित होते. World Fuel Day at Sakhari Agar