• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागरातील “गोपालकृष्ण भुवन” चा अमृतमहोत्सव

by Ganesh Dhanawade
August 16, 2022
in Guhagar
26 0
0
Amritmahotsav of "Gopalkrishna Bhuvan"

गुहागर खालचापाट येथील आरेकर यांचे घर

50
SHARES
144
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

स्वातंत्र्यदिनी लावलेली नक्षिदार फलक आजही अस्तित्वात

गुहागर, ता.16 : ब्रिटिशांच्या राजवटीचा अंत झाला आणि नवीन सूर्योदय झाला. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 या दिवसाची आठवण करून देणारी वास्तू म्हणजे गुहागर खालचापाट येथील “गोपालकृष्ण भुवन” स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना ही वास्तू आपलं अस्तित्व टिकवून आहे हे नवलच. स्वातंत्र्यदिनाचा लाकडी फलक ही वास्तू मोठ्या अभिमानाने मिरवते आहे. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan”

गुहागर खालचापाट येथील स्वर्गीय श्री. दानशूर मदनशेठ गोविंद आरेकर हे देशप्रेमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. गोरगरिबांचे संसार मार्गी लावण्यात त्यांचे मोठे योगदान असे. मदनशेठ यांचा जन्म 1903 रोजी झाला. त्यामुळे ब्रिटिश राजवटीचे जुलूम जवळून पाहिले. देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असल्याने भूमिगत चळवळीला त्यांचे मोठे योगदानहि दिले. गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान होते. मदनशेठ यांची भगवंत श्रीकृष्णावर निस्सीम भक्ती असल्यामुळे घराला गोपाल कृष्ण भवन व गुहागर हायस्कूला गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर असे नाव देण्यात आले. घराचे काम 1940 ला सुरू झाले. आणि पुढे सहा वर्ष सुरू राहिले. आरेकर  कुटुंबिय 15 ऑगस्ट 1947 ला या वास्तूत रहायला गेले. या वास्तूचे स्व. रामचंद्र घाडे यांनी काम केले असून घरावरील लाकडी फळक नक्षीकाम हे वाखाण्याजोगे आहे. पर्यटकांनी या घराचे लाकडी नक्षीकाम आकर्षित करते. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan“

Amritmahotsav of "Gopalkrishna Bhuvan"
आरेकर वास्तूवर स्वातंत्र्यदिनी लावलेली नक्षिदार फलक आजही अस्तित्वात

अनेक संकटाचा सामना करत श्री. दत्तात्रेय मदन आरेकर, स्व. सुदर्मा मदन आरेकर व विलास मदन आरेकर यांनी हा स्वातंत्र्याचा वारसा अविरत जपला. आणि आज त्यांची पुढची पिढी अवधूत आरेकर व अनिरुद्ध आरेकर हेही तितक्याच सचोटीने जपत आहेत. Amritmahotsav of “Gopalkrishna Bhuvan“

Tags: Amritmahotsav of "Gopalkrishna Bhuvan"GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share20SendTweet13
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.