• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
26 October 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

धर्म, धर्मशास्त्र व संस्कृतीवर आंतरराष्ट्रीय परिषद रत्नागिरी

by Guhagar News
August 13, 2022
in Ratnagiri
17 0
0
International conference at Ratnagiri

International conference at Ratnagiri

34
SHARES
97
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कालिदास विश्वविद्यालय व गोगटे महाविद्यालयातर्फे आयोजन

रत्नागिरी, ता.13 : रामटेकच्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पां. वा. काणे संस्कृत अध्ययन केंद्र आणि गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धर्म, धर्मशास्त्र व संस्कृती या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या परिषदेकरिता सिद्धांत नॉलेज फाउंडेशन, संस्कृती संवर्धन आणि संशोधन प्रतिष्ठान (मुंबई) यांचे सहकार्य लाभले आहे. येत्या १७ व १८ ऑगस्टला गोगटे महाविद्यालयात परिषद होणार आहे. International conference at Ratnagiri

पाच कुलगुरूंचा सहभाग

भारतातील तसेच भारताबाहेरील विद्वान मंडळींच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या परीषदेमध्ये एकूण पाच विद्यापीठांच्या मा. कुलगुरूंचा सहभाग असणार आहे. यामध्ये विविध विषयांवर शोधपत्रे प्रस्तुत केली जाणार आहेत. वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या धर्मकोशाचे तसेच धर्मविषयक विविध ग्रंथांचे प्रकाशनही  यावेळी केले जाणार आहे. संपूर्ण भारतातून विविध विश्वविद्यालयचे अध्यापक, शोध छात्र या परिषदेत सहभागी होणार आहेत. International conference at Ratnagiri

ग्रंथप्रदर्शन

याबरोबरच डॉ. पां. वा. काणे यांनी केलेले ग्रंथ लेखन कार्य एशियाटिक सोसायटी बॉम्बे आणि भांडारकर ओरीएंटल रिसर्च इंस्टीट्युट या दोन प्रमुख संस्थांद्वारे प्रकाशित केले गेले. त्यापैकी भांडारकर ओरीएंटल रिसर्च इंस्टीट्युटद्वारे डॉ. काणे यांच्या दुर्मिळ साहित्यकृतींचे प्रदर्शन गोगटे महाविद्यालयाच्या परिसरात उपस्थितांसाठी व स्थानिकांसाठी खुले असणार आहे. International conference at Ratnagiri

परिषदेची ठळक वैशिष्ट्ये

• धर्म, धर्मशास्त्र आणि संस्कृती” या विषयवर आधारित परिषदेमध्ये पार पडणाऱ्या विविध चर्चासत्रांद्वारे, विद्वानांच्या उद्बोधनपर मार्गदर्शनाने उपस्थितांना धर्म संकल्पनेचे स्वरूप समजून घेण्यास व या क्षेत्रात सखोल अध्ययन करण्यासाठी लाभ होईल.
• परिषदेदरम्यान प्रकाशित केल्या जाणाऱ्या धर्मविषयक ग्रंथ साहित्याद्वारे आधुनिक काळात  धर्मशास्त्रक्षेत्रात नव्या योगदानाची भर पडेल.
• संस्कृत व संस्कृतेतर क्षेत्रातील अध्यापकांना, शोध छात्रांना संशोधनाची नवी दृष्टी प्राप्त होऊन आंतरविद्याशाखीय संशोधनाला चालना मिळेल.
• संस्कृत व संस्कृतीचा प्रचार, प्रसार होऊन अध्यापक, विद्यार्थी यांना साशोधनाचे नवे मार्ग खुले होतील. International conference at Ratnagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiInternational Conference at RatnagiriLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.