गुहागर, ता.12 : तालुक्यातील पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीतर्फे रक्षाबंधन सणानिमित्त पोलीसांना राख्या बांधल्या. देशसेवेसाठी आपले कुटुंब व घरापासून दुर राहून कर्तव्य बजावणाऱ्या गुहागर पोलिस कार्यालयातील उपस्थित कर्मचारी व अधिकाऱ्यांना राखी बांधून बहिणीचे कर्तव्य पार पाडले. Raksha Bandhan at Guhagar Police Station

यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा, सौ. सुरभी भोसले, उपाध्यक्षा सौ. दिप्ती साळवी, विना काष्टे, सुवर्णा पागडे, अनुपमा पोरे, मानसी देवकर, वर्षा संसारे, यांनी पोलिस स्टेशन मधील गुहागर पोलीस ठाण्याचे प्रमुख तुषार पाचपुते, पोलीस उपनिरीक्षक जेपी कांबळे, पोलीस हेडकॉन्स्टेबल एच आर नलावडे, पोलीस नाईक आर एस धनावडे, पोलीस कॉन्स्टेबल श्री व्ही एस ओहळ, जमादार एस ए मयेकर, पोलीस शिपाई घोसाळकर, पोलीस शिपाई वैभव चौगुले, पोलीस नाईक विशाल वायंगणकर, पोलीस शिपाई उदय मोनए या उपस्थितांना राख्या बांधण्यात आल्या. Raksha Bandhan at Guhagar Police Station

पत्रकार उत्कर्ष समिती ही महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी कार्यरत नोंदणीकृत संस्था असुन समिती अंतर्गत महिलांच्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्ग काढुन तसेच त्यांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी महिला उत्कर्ष समिती हि अराजकीय उपसमिती कार्यरत आहे. Raksha Bandhan at Guhagar Police Station

