प्रा. रुचा खवणेकर ; पाटपन्हाळे महाविद्यालयात संशोधन कार्यशाळा
गुहागर, ता.12 : पाटपन्हाळे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात बुधवार दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी एकदिवशीय संशोधन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी डि.बी.जे कालेजच्या वाणिज्य विभाग प्रमुख रुचा खवणेकर उपस्थित होत्या. Research Workshop at Patpanhale College

विद्यापीठ व राज्य पातळीवर विद्यार्थ्यांनमध्ये संशोधनात वाढीस लागावे यासाठी अविष्कार तसेच विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. राज्य व केंद्र सरकार कडून मोठ्या प्रमाणात संशोधनासाठी प्रोत्साहन दिले जाते. त्याची तयारी महाविद्यालयातुनच विद्यार्थ्यांमध्ये व्हावी, यासाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये संशोधन म्हणजे काय हे सर्वप्रथम स्पष्ट केले. कालेजमध्ये असताना संशोधन कसे करावे. व त्यासंदर्भात विविध विषय कसे निवडावे याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. तसेच संशोधन करताना आपले निरिक्षण कसे असावे. की जेणेकरुन एखादी समस्या सोडविताना त्याचा उपयोग कसा होतो हे त्यांनी विविध उदाहरणाच्या आधारे स्पष्ट केले. संशोधन करताना व त्याविषयी माहिती गोळा करताना प्राथमिक व दुय्यम माहिती कशा प्रकारे गोळा करावी. की जेणेकरून संशोधनाचे निष्कर्ष अचुक होतील हे स्पष्ट केले. Research Workshop at Patpanhale College

संशोधन करताना प्रामुख्याने स्थानिक किंवा जिल्हा पातळीवरील विषय निवडावे की, जेणेकरून त्या समस्या सोडविण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. विद्यार्थ्यी जीवनात संशोधन करताना मर्यादा कशा प्रकारे येतात हे देखील सांगितले. मार्गदर्शन करताना राज्य पातळीवरील विविध संशोधन प्रकल्प कशा प्रकारे असतात. हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक दाखविले व विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे दिली. या एकदिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेसाठी प्रथम वर्ष वाणिज्य व कला वर्गाचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेची प्रस्तावना व सुत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. एस्. एस्. खोत यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पी.ए. देसाई व प्रा. गजभिये लंकेश यांनी विशेष प्रयत्न केले. Research Workshop at Patpanhale College

