रत्नागिरी, ता.12 : मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. तात्यासाहेब नातू कला व वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील कला व वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष ते तृतीय वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर तिरंगा” हा स्वातंत्र महोत्सवाचा उपक्रम साजरा करण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन गुरुवार दिनांक 11 जुलै 2022 रोजी करण्यात आले होते. Rally by Dr. Tatyasaheb Natu College


मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री मधुकरराव चव्हाण, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. श्री. मधुकरराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून 2 ऑक्टोंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 हे वर्ष भारतीय स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून “ उत्सव स्वातंत्र्याचा गौरव- स्वातंत्र्यवीरांचा “ विविध उपक्रम व कार्यक्रमाने साजरे केले जात आहे. यामध्ये क्रांतिकारक ,देशभक्तांची स्मृती जागवणारे अनेक कार्यक्रम जसे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन, व्याख्याने, रांगोळी यां उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमाची सांगता 15 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून यासाठी बहुसंख्य विद्यार्थी, नागरिकांनी महाविद्यालयात उपस्थित रहावे असे आव्हान श्री चव्हाण यांनी केले आहे. Rally by Dr. Tatyasaheb Natu College
भारताचे विद्यमान पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानुसार “हर घर तिरंगा” मोहिमेस प्रतिसाद देत डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भव्य रॅली आयोजित केली. या भव्य रॅलीमध्ये हातामध्ये तिरंगा घेत, घोषवाक्य असणारे बोर्ड व स्वातंत्र्याची भावना प्रज्वलित करणारे “जय जवान -जय किसान “,”हर घर तिरंगा”,” हम सब एक है “,”भारत माता की जय “ या घोषणेने मार्गताम्हाने परिसर देशभक्तीमय बनवला होता. या रॅलीचे आयोजन महाविद्यालय पासून ते मार्गताम्हाणे खुर्द येथील अंगणवाडी पर्यंत तसेच तेथून ते मार्गताम्हाने येथील बाजारपेठ येथे पर्यंत करण्यात आले होते. संस्थेचे संचालक श्री. अजित साळवी यांनी यामध्ये उपस्थित राहून सहभागी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. या रॅलीमध्ये मार्गताम्हाने एज्युकेशन सोसायटीचे कै. वसंतराव भागवत माध्यमिक विद्यालय व कै. के. व्ही.पेठे ज्युनिअर कॉलेजमधील बहुसंख्य विद्यार्थी सहभागी होते. भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनी केलेल्या आवाहनानुसार “हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत हातात तिरंगा घेऊन या विद्यार्थ्यांनी मार्गताम्हाने परिसर हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या क्रांतिकारक, बलिदानी लोकांची आठवण करून देणाऱ्या देशमय समर्पित भावनांनी भारावून टाकला होता. Rally by Dr. Tatyasaheb Natu College


या रॅलीच्या कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. डोंगरे, आय. क्यू.एसी. समन्वयक डॉ. सुरेश सुतार, डॉ.राजे, प्रा.विकास मेहेंदळे, प्रा. युवराज जाधव, डॉ. संगीता काटकर, डॉ.प्राजक्ता शिंदे , प्राध्यापक भरत गोंजारे, प्राध्यापक प्रियांका निकम, प्रा. वर्षा बोभस्कर, प्रा.तनवी भागवत, प्रा. भारती भोसले, प्रा. विलास शेंडगे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. Rally by Dr. Tatyasaheb Natu College