‘फाळणीच्या वेदना’ विषयावर रत्नागिरीत १३ ऑगस्टला व्याख्यान
रत्नागिरी, ता. 11 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (दक्षिण रत्नागिरी), सांस्कृतिक वार्तापत्र (पुणे) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या विद्यमाने फाळणीच्या वेदना या विषयावर सावरकरप्रेमी आणि प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे व्याख्यान देणार आहेत. शनिवार दि. 13 ऑगस्ट सायंकाळी ४ वाजता हे व्याख्यान नगर वाचनालयाच्या सभागृहात होणार आहे. Lecture by actor Sharad Ponkshe


क्रांतीविरांच्या अपार मेहनतीमुळे भारत देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. भारत व पाकिस्तानची फाळणी झाली. नंतर काही काळाने बांग्लादेशाची निर्मिती झाली. सध्या पुन्हा हिंदूना धमक्या देणे, १९४७ ची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते, देश फाळणीच्या उंबरठ्यावर नेला जाऊ शकतो, अशी भाषा बोलली जाते. त्यामुळे फाळणीची कारणमीमांसा सर्वसामान्य समजून घेणे गरजेचे आहे. याकरिता शरद पोंक्षे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. या वेळी सांस्कृतिक वार्तापत्राच्या फाळणीच्या वेदना व साप्ताहिक विवेकने अखंड भारत का, कसा ही पुस्तके साकारली आहेत. त्यांचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. Lecture by actor Sharad Ponkshe


या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रा. स्व संघाचे जिल्हा कार्यवाह डॉ. प्रफुल्ल सप्रे, सांस्कृतिक वार्तापत्राचे कार्यवाह शिरीष पदे आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे. Lecture by actor Sharad Ponkshe