गुणवंतांचा सत्कार, शैक्षणिक साहित्य वाटप व हर घर तिरंगा योजनेसंदर्भात माहिती
गुहागर, ता.10 : तालुक्यातील पालशेत येथील दर्यावर्दी प्रतिष्ठान यांच्या वतीने श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय पालशेत येथे गुणवंत सत्कार व शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ पार पडला. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत हर घर तिरंगा या योजनेसंदर्भात सर्व ग्रामस्थांनी 13 ते 15 ऑगस्ट रोजी आपल्या घरासमोर भारतीय तिरंगा फडकवावा आणि देशाच्या हर घर तिरंगा कार्यक्रमात सहभागी व्हावे, राष्ट्राभिमान जोपासावा असे आवाहन केले. Various programs by Daryawardi Foundation

या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी श्री नरेंद्र गावंड, गटशिक्षणाधिकारी श्रीमती लीना भागवत, सरपंच सौ. संपदा चव्हाण, श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जोगळेकर, स्कूल कमिटी सदस्य पंकज बिर्जे, दर्यावर्दी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पांडुरंग दाभोळकर, दर्यावर्दी प्रतिष्ठान महिला मंडळ अध्यक्षा सौ. मेघा पाटील, संचालक संतोषज पावरी आदी मान्यवर उपस्थित होते. Various programs by Daryawardi Foundation
कार्यक्रमाची सुरुवात पालशेत विद्यालयाच्या गितमंच्याच्या टीमने सुरेल आवाजात गायलेल्या ईशस्तवन आणि स्वागतपद्याने झाली. आपल्या गोड आवाजांनी सर्व श्रोतेवर्गाला मंत्रमुग्ध केले. सर्व पाहुण्यांचे स्वागत स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित माझी जन्मठेप हे बुक, पुष्प व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दर्यावर्दी प्रतिष्ठानचे सचिव दिनेश जाक्कर यांनी केले. यामध्ये दर्यावर्दी प्रतिष्ठानची स्थापना ते प्रतिष्ठान आयोजित करत असलेल्या विविध उपक्रम, आतापर्यंत प्रतिष्ठानने केलेले समाजकार्य, तसेच भविष्यामधील दर्यावर्दी प्रतिष्ठानची ध्येय धोरणं यासंदर्भातही माहिती दिली. Various programs by Daryawardi Foundation

यावेळी बोलताना श्रीम. लीना भागवत यांनी दर्यावर्दी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं कौतुक करून गुणवंतांना म्हणाल्या की, अजून तुम्हाला अनेक टप्पे सर करायचे आहेत. प्रयत्न करत रहा यश नक्की मिळेल. कोकणामध्ये भरपूर टॅलेंट आहे. परंतु, कोणीही स्पर्धा परीक्षा देत नाहीत. येथील बहुतांश अधिकारी हे परजिल्ह्यातील आहेत. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून आपणही अधिकारी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मच्छीमार महिलांनी सुद्धा पारंपरिक पद्धतीनेच मच्छी विक्री करण्यापेक्षा मच्छीवर प्रक्रिया करून तयार होणारे नवनवीन पदार्थ तयार करून स्वयंरोजगरकडे वळावे. तसेच खारवी समाजाला उद्बोधन करून शैक्षणिक स्तर उंचावून पारंपरिक व्यवसायापेक्षा वेगळी क्षेत्रे निवडावीत असे सूचित केले. Various programs by Daryawardi Foundation
दर्यावर्दी प्रतिष्ठानचे संचालक संतोष पावरी यांनी अनेक उदाहरणे देत आपण जीवनामध्ये कसे यशस्वी होवू, यासंदर्भात आवेश पूर्ण माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली. दर्यावर्दी प्रतिष्ठान करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच आपण शिकत रहा. दर्यावर्दी सतत आपल्या पाठीशी आहे असा विश्वास विद्यार्थ्यांना दिला. उपशिक्षणाधिकारी गावंड यांनी मार्गदर्शन करताना मच्छिमार बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना हात घातला. आपण कसे घडलो, शिक्षणासाठी कशी मेहनत घेतली, विद्यार्थीदशेत कोणकोणती कामं केली याचा आदर्शच विद्यार्थ्यांसमोर ठेवला. विद्यार्थ्यांनी प्लेन ग्रॅज्युएशन करण्यापेक्षा वेगळ्या वाटा निवडाव्यात, वेगवेगळे कोर्स करावेत, फिशरीज कॉलेज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा उपयोग करून मत्स्यसंवर्धन करावे या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जे प्रत्यक्ष मासेमारी करतात त्यापैकीच लोकांनी पुढे येऊन मच्छी प्रोसेसिंग सारख्या व्यवसायामध्ये उतरावे असे मत व्यक्त केले. यावेळी पंकज बिर्जे, सरपंच सौ. संपदा चव्हाण, मुख्याध्यापक मनोज जोगळेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Various programs by Daryawardi Foundation

सदर कार्यक्रमात इ. दहावीचे 23 विद्यार्थी, इ. बारावीचे 16 विद्यार्थी, पाचवी व आठवी स्कॉलरशिप प्राप्त 6 विद्यार्थी, प्रतिष्ठानमधील ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले, डिग्री, डिप्लोमा केलेले तसेच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांपैकी बढती मिळलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कुणाल दाभोळकर यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पालशेत हायस्कूलमधील इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या गरीब, होतकरू व हुशार अशा एकूण 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देण्यात आल्या. रजत पाटील, अपूर्व पाटील, चिन्मयी जाक्कर आणि मृण्मयी पटेकर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. Various programs by Daryawardi Foundation
गुणवंत सत्कार समारंभ कार्यक्रमाची सर्व जबाबदारी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजी पालशेतकर, ज्ञानेश्वर पाटील, संजय वासावे, तुषार पालशेतकर, तुषार पाटील व सुनील पाटील यांनी खूप मेहनत घेऊन पार पाडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पाटील यांनी तर आभार दिनेश जाक्कर यांनी केले. Various programs by Daryawardi Foundation
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दर्यावर्दी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते जगदीश पाटील, राजू वासावे, विकास दाभोळकर, राजकुमार आगडे, प्रशांत होडेकर, सुनील जाक्कर, अरविंद पाटील, सत्यवान भायनाक, रामा जाक्कर, हरिश्चंद्र कोलकांड, प्रतिम वासावे,राजू म्हातनाक, विकास पाटील, प्रज्ञेश जाक्कर,सुधीर दाभोळकर, हरेष पटेकर,राकेश आगडे, निलेश म्हातनाक, महिला मंडळ कार्यकर्त्यांमध्ये सौ.वैजयंती पटेकर, जलपरी आगडे, रंजना वासावे, जतिशा पाटील, नेहा पाटील, साची पाटील, विशाखा पाटील, आर्या पाटील, सिद्धी दाभोळकर, हर्षली जाक्कर, नीलिमा वासावे, सुचिता म्हातनाक, निलांबरी म्हातनाक यांसारखे कार्यकर्ते उपस्थित होते. Various programs by Daryawardi Foundation
