कऱ्हाडे ब्राह्मण संघ व संस्कार भारतीतर्फे आयोजन
रत्नागिरी, ता. 10 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक १२ रोजी संध्याकाळी ५.०० वाजता कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शेरे नाका येथील कर्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात व्याख्यान, संगीत कार्यक्रम कार्यक्रम होणार आहे. Lectures, music programs at Ratnagiri

या कार्यक्रमात साखरपा येथील योगशिक्षक विनोद केतकर हे ‘स्वातंत्र्यलढ्याचे उत्तरदायित्व’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. विनोद केतकर हे बीएसस्सी (गणित) असून योगशिक्षक आहेत. ते संमोहन उपचारही करतात. विश्व हिंदू परिषदेचे देवरुख प्रखंड मंत्री आहेत. १९९२ मध्ये अयोध्येत राम मंदिर उभारणीच्या कार्यात कारसेवक म्हणून त्यांनी योगदान दिले आहे. Lectures, music programs at Ratnagiri

विलणकर यांच्या घरात गेली सुमारे ७० वर्षे घरात तिरंग्याचे पूजन केले जाते. याविषयी देशप्रेमी श्रीमती संजिवनी विलणकर भारतमाता मंदिर उभारण्याच्या संकल्पाबाबत माहिती देणार आहेत. यानंतर रत्नागिरीतील कलाकार पांडुरंग बर्वे व सहकारी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघ आणि संस्कार भारती यांच्या वतीने करण्यात आले आहे. Lectures, music programs at Ratnagiri