गुणगौरव सोहळा तसेच शेतकऱ्यांना ७/१२ व दाखल्याचे वाटप
गुहागर, ता. 4 : गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल दिनी यशस्वी उद्योजक, समाज कार्य करणाऱ्या व्यक्ती, महसुल विभागाचे उत्कृष्ठ कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगाना अंत्योदय रेशन कार्ड वाटप, विविध दाखले, शेतकऱ्यांना सात बारा, फेरफार वाटप कार्यक्रम पार पडला. Various programs on Revenue Day


यावेळी व्यासपीठावर गुहागर तालुक्याच्या कार्यतत्पर तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रभारी निवासी नायब तहसीलदार ए. एस. प्रभू देसाई, उद्योजक रसिका राजन दळी, अरुण परचुरे, गुहागर हायस्कूलचे उप मुख्यध्यापक सुधाकर कांबळे व महसुलच्या विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते. महसूल दिनी झालेल्या सत्कार सोहळ्यात टेराकोटा वस्तू निमिर्ती व रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्राचा जिल्हा पुरस्कार प्राप्त रसिका राजन दळी (धोपावे), तसेच श्रीदेव गोपाळ कृष्ण विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज गुहागर उपप्राचार्य सुधाकर शामराव कांबळे यांचा सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे गुहागर तहसील कार्यालयातील उत्कृष्ट महसुली कर्मचारी म्हणून अव्वल कारकून श्रीमती वर्षा तारवे, पाटपन्हाळेचे उत्कृष्ठ मंडळ अधिकारी ए. एस. काजरोळकर, आबलोलीचे उत्कृष्ठ मंडळ अधिकारी सचिन पंढरीनाथ गवळी, उत्कृष्ठ महसूल सहाय्यक अक्षय किरण संख्ये, पालपेणे सजाचे उत्कृष्ठ तलाठी दिलीप रघुनाथ नागरगोजे, मढाळचे उत्कृष्ठ तलाठी एस. जी. कदम, उत्कृष्ठ शिपाई अनंत धोंडू शिगवण, गुहागरचे उत्कृष्ठ कोतवाल अमित जोशी, आरेचे उत्कृष्ठ कोतवाल कल्पेश पवार, पाटपन्हाळेचे उत्कृष्ठ कोतवाल रवी भेकरे, वेलदूरचे उत्कृष्ठ कोतवाल अजय गुढेकर यांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. Various programs on Revenue Day


गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमात कु. प्राची अशोक शिंदे (इंजिनियरींग बीटेक, आयटी), कु. अनुप विश्वनाथ वासावे (पदवी), कु. सिमरन संजय नागवेकर (१२वी सायन्स पास), कु. ऋजुता नितीन दिक्षीत (ई. १० वी. बाल भारती पब्लिक स्कूल आरजीपीपीएल ), कु. अभिनव मनोज शिंदे (राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा सन २०२२ मध्ये सेंट्रल रॅक तृतीय), कु. मैत्रेयी मनोज शिंदे (राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परिक्षा सन २०२२ मध्ये सेंट्रल रॅक प्रथम) यांना प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालयातील उत्कृष्ट ऑपरेटर म्हणून प्राची दिवेश कनुटकर, रुणाली सुरेश बागकर, सिध्दी देवीदास साखरकर, वृषाली समिर महाडिक, चैताली संतोष आरेकर तसेच सेतू कार्यालयातील उत्कृष्ठ कर्मचारी गणेश गोयथळे यांना तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संजय गांधी लाभार्थी, अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना रेशनकार्ड वितरण, सेतू कार्यालयातील विविध दाखले वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांना ७/१२ वाटप, ७/१२ दुरुस्ती आदेश व सदर दुरुस्ती बाबतचा ७/१२ व फेरफार वाटप केले. माजी सैनिक रविंद्र शिर्के, मुंढर यांस वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कोळवणकर यांनी केले. Various programs on Revenue Day

