मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळाच्या सदस्या यांचे प्रतिपादन
गुहागर, ता. 30 : भारतीय स्वातंत्र्यसंग्रामामध्ये भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची जाज्वल्य देशभक्ती वृद्धिंगत करून त्यांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित करण्याचे तसेच ब्रिटिशांनी भारतीयावर लादलेल्या गुलामीचे जाळे नष्ट करण्यासाठी भारतीयांना प्रेरक शक्ती देण्याचे महान कार्य हिंदी साहित्यकारांनी केले. असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या हिंदी अध्ययन मंडळाच्या सदस्या व आय.सी.एस महाविद्यालय, खेड येथील हिंदी विभागप्रमुख डॉ.विद्या शिंदे यांनी केले. शुक्रवार दि. 29 जुलै 2022 रोजी मार्गताम्हने एज्युकेशन सोसायटी द्वारा आयोजित " स्वतंत्रता संग्राम में हिंदी साहित्यकारों का योगदान " या अतिथी व्याख्यानात त्या बोलत होत्या. अतिथी व्याख्यानाचे आयोजन स्वर्गीय रुक्मिणी गणपतराव चव्हाण सभागृहांमध्ये करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.राजश्री कदम होत्या. Contribution of Hindi Literary Writers

मार्गताम्हने एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष मा. मधुकरराव चव्हाण यांनी भारताला मिळालेल्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त 2 ऑक्टोंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 हे वर्ष "उत्सव स्वातंत्र्याचा -गौरव स्वातंत्र्यवीरांचा" याशिर्षकांतर्गत भारतीय क्रांतिकारकांच्या महापुरुषांच्या कार्याचे स्मरण करून देणाऱ्या विविध उपक्रमांनी साजरे करण्याचे ठरवले. यामध्ये क्रांतिकारकांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या काव्यवाचन स्पर्धा, देशभक्तीपर गीते, स्वातंत्र्यवीरांच्या कार्याची ओळख करून देणारे चित्र प्रदर्शन, रांगोळ्या, वक्तृत्व स्पर्धा, चित्र रेखाटन स्पर्धा यासारख्या विविध उपक्रमांचे आयोजन केले गेले आहे. Contribution of Hindi Literary Writers
डॉ.विद्या शिंदे यांनी आपल्या मार्गदर्शनपर विचारांमध्ये भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व स्पष्ट करीत या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या अगणित क्रांतिकारकांना प्रेरणा देणाऱ्या हिंदी कवी, नाटककार, उपन्यासकार साहित्यकारांचे योगदान स्पष्ट केले. यामध्ये इंग्रजांच्या भारतीय लोकांच्या आर्थिक शोषणाच्या धोरणाविरुद्ध इंग्रजांना खुले आव्हान देणारे कवी भारतेंदु,"खूप लडी मर्दानी वह झाशीवाली राणी " कविता लिहिणारी सुभद्रकुमारी चौहान, तर "मुझे तोड लेना वनमाली उस पथ पर देना तुम्हे जिस पथ से जावे वीर अनेक " अशी रचना करणारे माखनलाल चतुर्वेदी, सारख्या साहित्यकारांचे महत्त्व स्पष्ट करीत प्रेमचंद जयशंकर प्रसाद सारख्या साहित्यकारांच्या साहित्यावर ब्रिटिशांनी कशाप्रकारे बंधने लादत ते साहित्य जप्त केले, हेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच कबीरदास तुलसीदास महात्मा गांधी जयशंकर प्रसाद, सूर्यकांत त्रिपाठी निराला, राष्ट्रकवी मैथिलीशरण गुप्त, "सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा" अशी कविता लिहिणारे इकबाल, बंकिमचंद्र चटर्जी यासारख्या हिंदी साहित्यकारांचे स्वातंत्र्यसंग्रामातील कार्याचा आढावा घेत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव समयी या हिंदी साहित्यकारांचे महत्त्व आपण सर्वांनी विसरता कामा नये, याबद्दलही त्यांनी सर्वांना आवाहन केले. Contribution of Hindi Literary Writers
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. राजश्री कदम यांनी मार्गताम्हने एज्युकेशन सोसायटी द्वारा साजरे केल्या जाणाऱ्या या "उत्सव स्वातंत्र्याचा- गौरव स्वातंत्र्यवीरांच्या " उपक्रमांचे महत्त्व स्पष्ट करीत प्रत्येक भारतीयाने या स्वातंत्र्यवीरांच्या, क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल आदर ठेवला पाहिजे ,असे आवाहन केले. 15 ऑगस्ट 2022 रोजी या उपक्रमांचा भव्य सांगता कार्यक्रम संपन्न होणार आहे याबद्दल माहिती दिली. Contribution of Hindi Literary Writers

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.युवराज जाधव यांनी केले. अतिथी परिचय प्रा.विलास शेंडगे यांनी तर आभार हिंदी विभागप्रमुख प्रा. रामचंद्र माने यांनी मांनले. कार्यक्रमास प्रा.विकास मेहंदळे, डॉ.सुरेश सुतार, डॉ.संगीता काटकर, डॉ. राजे, डॉ. डोंगरे, डॉ. शिंदे. प्रा. प्रियांका निकम, प्रा. भरत गोंजारे, संदीप चव्हाण, संदीप जंगम, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. Contribution of Hindi Literary Writers
