गुहागर भंडारी भवन येथे दि. 31 जुलै सकाळी 11 वाजता
गुहागर, ता. 27 : गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दि. 31 जुलै 2022 रोजी कै इंदिरा वासुदेव शेटे सभागृह भंडारी भवन येथे सकाळी 11 वाजता मान्यवरांचे उपस्थित करण्यात येणार आहे. तरी इयत्ता 10 वी, 12 वी, पदवीधर व राज्य खेळाडूं विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. Honored by the Bhandari community

तसेच कार्यक्रमाच्यावेळी नुकतीच कित्ते भंडारी समाज दादर मुंबई या संस्थेच्या ऐतिहासिक निवडणूकीत भरत शेटे व त्यांचे पॅनेलने अभुतपूर्व यश संपादन केले, त्याबद्दल गुहागर तालुका भंडारी समाजाच्या वतीने भरतदादा शेटे यांचा जाहिर नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. तरी गुहागर तालुक्यातील तमाम भंडारी बांधवांनी व सर्व सत्कारमुर्ती विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गुहागर तालुका भंडारी समाज संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. Honored by the Bhandari community
