• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
6 February 2026, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

गुहागर तालुक्यातील शाळांच्या पटसंख्याला गळती

by Ganesh Dhanawade
July 26, 2022
in Guhagar
17 0
0
Less than 10 children in 38 schools
34
SHARES
96
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जि. प. च्या ३८ शाळांची पटसंख्या १० च्या आत

गुहागर, ता. 26 : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सेमी इंग्रजी शिक्षण प्रणाली सुरू झाल्यापासून कोरोनापूर्वी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थी प्रवेशाची संख्या वाढलेली दिसत होती. मात्र, तालुक्यात २०१४ मध्ये २११ जिल्हा परिषदेच्या शाळा होत्या. त्या आता १९६ वर आल्या आहेत. यामधूनही १० व १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या गुहागर तालुक्यात तब्बल ३८ शाळा सुरू आहेत. Less than 10 children in 38 schools

गुहागर तालुक्यात यावर्षी गुहागर जांगळेवाडी ही शाळा पूर्णपणे बंद पडली आहे. येथील शिक्षकांना वरवेली शाळेवर कामगीरीवर काढण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या १९६ शाळा आहेत. या शाळांमधून ३८ शाळांची विद्यार्थी पटसंख्या १० च्या खाली आहे. यामध्ये गुहागर उर्दु विद्यार्थीसंख्या ५, असगोली नं. २ विद्यार्थी ४, आरे देवरहाटी विद्यार्थी ९, वेलदूर नवानगर उर्दु विद्यार्थी, साखरी त्रिशुळ पालकोट विद्यार्थी १०, आरे नागदेवाडी विद्यार्थी ८, कातळवाडी विद्यार्थी ७, हेदवी नं. २ विद्यार्थी ६, मुसलोंडी विद्यार्थी ३, चिंद्रावळे नं.१ विद्यार्थी ९, चिंद्रावळे नं. २ विद्यार्थी ९, पोमेंडी आडीवाडी  विद्यार्थी ६, गोणवली विद्यार्थी ९, जामसूत नं.२ विद्यार्थी २, जामसूत पातेवाडी विद्यार्थी ७, पिंपर नं.३ विद्यार्थी ८, मुंढर नं. २ विद्यार्थी ७, झोंबडी नं.२ विद्यार्थी ८, पाली नं २ विद्यार्थी ४, पाली देनवाडी विद्यार्थी २, कुटगिरी नं. २ विद्यार्थी ३, कुटगिरी नं. ३ विद्यार्थी ९, निगुंडळ आडी विद्यार्थी ७, तळवली डावलवाडी  विद्यार्थी ५, परचुरी नं. २ विद्यार्थी ९, पेवे उर्दु विद्यार्थी ४, पांगारी आखरवाडी १, खोडदे नं. ३ गोणबरे विद्यार्थी ९, खोडदे निवातेवाडी  विद्यार्थी १, खोडदे डिंगणकरवाडी विद्यार्थी ४, मासू नं. २ विद्यार्थी ६, शीर नं.५ विद्यार्थी ८, मासू नं.३ विद्यार्थी ५, कोतळुक नं. ४ विद्यार्थी ३, सुरळ उर्दू विद्यार्थी १०, काताळेकोंड विद्यार्थी ३, पाचेरी आगर नं.३ विद्यार्थी ४, पाचेरीसडा नं.३ विद्यार्थी ८ या शाळांचा समावेश आहे.  Less than 10 children in 38 schools

यामध्ये १ विद्यार्थी संख्या असलेल्या २ शाळा, २ व ३ विद्यार्थी संख्या असलेल्या ३ शाळांचा सामावेश आहे. शासनाने 30 व 30 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बाजुच्या शाळांमध्ये वर्ग करण्याचे आदेश काढले आहेत. परंतु ग्रामिण दुर्गम भागातील या शाळा दुसऱ्या शाळांच्या तीन किलोमिटरपेक्षा जास्त अंतराने असल्याने या शाळा सुरू ठेवण्यात आल्या आहेत.  Less than 10 children in 38 schools

कोविडमधील २ वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी नियमितपणे जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू झाल्या. गुहागर तालुक्यातील १९६ शाळांमध्ये ७२११ विद्यार्थी आहेत. यातील यावर्षी पहिलीच्या वर्गामध्ये १०९० नवागत विद्यार्थ्याचा प्रवेश झाला आहे. यातील १३ शाळांमध्ये एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश झाला नाही. यामुळे पहिलाच्या वर्गाची पटसंख्या झीरो दिसून येत आहे. काही शाळांमध्ये १ व २ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे. Less than 10 children in 38 schools

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarLess than 10 children in 38 schoolsMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share14SendTweet9
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.