• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
24 August 2025, Sunday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

संघटीत झाल्याने आरक्षणाचा लढा यशस्वी

by Ganesh Dhanawade
July 24, 2022
in Politics
16 1
0
Demand for caste wise census

पांडुरंग पाते

32
SHARES
92
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पांडुरंग पाते ; जातनिहाय जनगणनेची मागणी कायम

गुहागर, ता. 24 : राजकिय आरक्षणाच्या लढ्यात सर्व ओबीसी बांधवांच्या संघटीत सहकार्याने आपण यशस्वी झालो. प्रामाणिक आत्मीयतेने संविधानिक लढा देणाऱ्या सर्व संबंधित राजकिय पक्षांचे आपणास सहकार्य लाभले. त्यामुळे या यशाचे श्रेय व्यक्तीगत नसून सामुदायिक आहे. ओबीसींची जातनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. आणि आमची ती कायम मागणी असेल, असे प्रतिपादन गुहागर तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष पांडुरंग पाते यांनी केले आहे. Demand for caste wise census

केवळ ढोबळ माहितीच्या आधारे यश प्राप्त होऊ शकते. तर मग ओबीसींची  जनगणना झाली तर जातनिहाय संख्या आणि नोकरी, शिक्षण, आर्थिक इ. बाबतची प्रत्यक्षात वास्तवता बांठीया आयोगाला सर्वोच्च न्यायालयात मांडता आली असती. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणातील आमुलाग्र बदल दिसला असता असेही मत पांडुरंग पाते यांनी मांडले. Demand for caste wise census

गुहागर तालुक्यात सर्व ओबीसी समाज घटकांनी या लढ्यामध्ये आपले योगदान देऊन राज्य व जिल्हा नेतृत्वाच्या मार्गदर्शनानुसार कार्य केले. त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच जातनिहाय जनगणनेसाठी हा लढा असाच अविरतपणे सुरू राहील असेही सांगितले. तालुका-जिल्हा स्तरावर सल्लागारांसहित गुहागर तालुका समिती व सर्व जिल्हा परिषद गटांच्या उपसमित्यांचे पदाधिकारी, तळागाळातील सर्व शिलेदारांनी आणि पत्रकार मित्रांनी कसलीही तमा न बाळगता ओबीसी चळवळीप्रती आपली प्रामाणिक भूमिका पार पाडली. त्याचीच हि फलश्रूती आहे. त्याबद्दल ओबीसी संघर्ष संबंधित समिती कार्यकारिणीच्या वतीने अध्यक्ष पांडुरंग पाते, सरचिटणीस निलेश सुर्वे यांनी सर्वांचे अभिनंदनासह आभार मानले आहेत. Demand for caste wise census

Tags: Demand for caste wise censusGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.