• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
22 October 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन

by Ganesh Dhanawade
July 24, 2022
in Guhagar
17 0
0
आ. बेंडल यांच्या २८ व्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन
33
SHARES
94
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

लोकनेते माजी आ. रामभाऊ बेंडल त्यांच्या कार्याला दिलेला उजाळा

गुहागर, ता. 24 :  त्यागी व्रुतीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या विकासाचा ध्यास घेतलेले थोर समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात देवमाणसाचे स्थान असलेले समाजनेते व गुहागर तालुक्याचे माजी आमदार कै. रामभाऊ बेंडल साहेब यांचा “२८ वा” स्मृतीदिन आज २४ जुलै रोजी आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कार्याला दिलेला हा उजाळा. MLA Bendal’s memorial day today

मुंबई येथे २४ जुलै १९९४ रोजी गुहागर तालुक्यातील कार्यकर्त्यांची सभा संपता संपता हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. आज या दुःखद घटनेला २८ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यांनी आपला प्रत्येक क्षण बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी खर्च केला. सर्व समाज सुशिक्षित, सुसंस्कृत व स्वावलंबी व्हावा, म्हणून त्यांनी अविरत प्रयत्न केले. म्हणून आजही जनमानसात त्यांची “देवमाणूस” म्हणून ओळख आहे. सर्व समाज एकसंघ व्हावा, हा ध्यास त्यांनी सदैव बाळगला. आज त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना विनम्र भावाने आदरांजली अर्पण करुन त्यांच्या कार्याला काहीसा उजाळा देण्याच्या हेतुने हा लेखन प्रपंच करीत आहे. MLA Bendal’s memorial day today

अनेक संस्थांचे आधारस्तंभ

गुहागर तालुका कुणबी समाज संघटना, संत तुकाराम छात्रालय, गुहागर तालुका जनता शिक्षण संस्था, गणेश क्रेडीट को. आँ. सह. सोसायटी, सहकारी पतसंस्था, प्रियदर्शनी गृहतारण संस्था, संत तुकाराम ग्राहक वस्तुभांडार म्हणजेच आजचा गुहागर बाजार, फलोद्यान सहकारी संस्था, मजूर सहकारी संस्था या सर्व संस्थांचे संस्थापक व अध्यक्ष होते. काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष, विधानपरिषद व विधानसभेचे सदस्य, एस्. टी. महामंडळचे सदस्य व राज्य विद्युत मंडळाचे सदस्य यासारखी अत्यंत महत्वाची पदे जबाबदारीने भूषवली.व त्या पदांची प्रतिष्ठा वाढवली. सतत कार्यमग्न असलेले कै. रामभाऊ बेंडल म्हणजे निस्वार्थी त्यागाची मूर्ती होते. MLA Bendal’s memorial day today

रामभाऊंचा जन्म अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबात १५ जुलै १९२९ रोजी झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत व हलाखीत गेल्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर त्याचे घाव खोलवर जखमा करून गेले. या जखमी मनामुळे त्यांची वृती विचारी बनली. आपण शिकून आपल्या समाजबांधवाना अशिक्षितपणातून बाहेर काढल्याशिवाय क्रांतीची दारे खुली होणार नाहीत. तसेच शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. हे त्यांनी ओळखले व त्यासाठी आयुष्यभर चंदनापरी झिजले. परिस्थितीच्या प्रखर झळा सोसून फार कष्टाने आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबई येथे पोलीस खात्यात उच्च अधिकारी पदावर नोकरी मिळाली. नोकरीत असतानाच स्वतः अनुभवलेली समाजाची हालाखीची परिस्थिती त्यांना बेचैन करू लागली. आपला समाज इतर समाजाच्या मानाने अशिक्षितपणाने गांजला आहे. आणि त्याचा फायदा तत्कालीन उच्चभू समाजातील लोक घेत आहेत. हे पाहून त्यांचे हृदय हेलावले. दारिद्र्याने गांजलेल्या, शिक्षणपासून वंचित राहिलेल्या व उच्चभ्रूंच्या त्रासाने सत्व हरुन बसलेल्या आपल्या समाज बांधवांसाठी सर्व काही तुच्छ मानून आपल्या कोटुंबिक सौख्याचा विचार न करता त्यांनी १२ वर्षाच्या शासकीय सेवेचा राजीनामा देऊन गुहागर या आपल्या जन्मभूमिकडे धाव घेतली. व समाजसेवेचे व्रत घेवून गावोगावी पायी फिरले, कार्यकर्ते जोडले, संघटना उभारली आणि असामान्य असे सामाजिक कार्य लोकांना बरोबर घेऊन शेवटपर्यंत करीत राहिले. MLA Bendal’s memorial day today

शैक्षणिक प्रगतीचा प्रवास

समाजाच्या हलाखीला, गरिबीला कारणीभूत असलेल्या अशिक्षितपणाबद्दल रामभाऊंना अपार दुःख होते. समाजातील प्रत्येक कुटुंब आणि त्या कुटुंबातील घटक सुशिक्षीत झाला तर या समाजाचे हलाखीचे जीवन संपुष्टात येईल हे त्यांनी ओळखले. यासाठी प्रत्येकाने शिकलेच पाहिजे अशी त्यांची तळमळ होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आणि सुधारणेचे साधन आहे हे जाणून समाजामध्ये सभा, अधिवेशन आणि मेळावे यांच्या माध्यमातून लोकजागृती केली. त्यांनी शिक्षण संस्था काढून लोकांना सुशिक्षित करण्याचा चंग बांधला. आपल्या मुला- मुलींना पालकांनी शाळेत घातलेच पाहिजे. यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. शिक्षणासाठी खेडेगावातून येणाऱ्या मुला, मुलींना राहण्यासाठी गुहागर येथे संत तुकाराम छात्रालय व प्रियदर्शनी कमला नेहरु मुलींच्या वसतिगृहाची उभारणी केली. MLA Bendal’s memorial day today

अंधश्रध्देवर प्रहार

आपल्या समाजाच्या हलाखीला अशिक्षितपणा जसा जबाबदार आहे, तसाच अंधश्रध्देमुळे आपला समाज पोखरलेला आहे याची जाणीव होती. शैक्षणिक कार्याबरोबर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी खूप झगडावे लागले. लोकांचे लक्ष वास्तवतेकडे वळवण्यासाठी त्यांनी दिवसरात्र एक करुन कार्यकर्त्यांच्या मदतीने लोकांमध्ये जागृती केली. आज रामभाऊंच्या या श्रमाचे चीज झाल्याचे जागोजागी दिसून येत आहे. आज बहुजन समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत झाला आहे. प्रगतीचा एक एक टप्पा गाठीत आहे त्याचे सर्व श्रेय रामभाऊंच्या त्यागी व निःस्वार्थी वृत्तीलाच द्यावे लागेल. MLA Bendal’s memorial day today

रामभाऊंची समाजसेवेची तळमळ आणि त्यागी वृत्ती पाहून लोकांनी त्यांना आपले लोकनेते म्हणून स्विकारले. आपले परिवर्तन करण्याची क्षमता केवळ याच नेतृत्वाकडे आहे याची जाणीव झालेल्या जनतेने १९८० साली त्यांना विधानसभेवर निवडून दिले. राजकारणातही सर्वांना बरोबर घेऊन सन्मानाची वागवून दिली व जनतेचा विश्वास संपादन केला. कोकणातील अनेक प्रबळ कार्यकर्त्यांना एकत्र करून एकजुटीने काम करण्याचा नवा पायंडा त्यानी घालून दिला. आमदार म्हणून कार्य करीत असताना केवळ सुडाचे किंवा संकुचित वृत्तीचे राजकारण न करता मतदार संघातील विकास कामांची बांधिलकी त्यांनी पत्करली होती. MLA Bendal’s memorial day today

तत्कालिन महाराष्ट्राचे मुख्यमत्री नामदार शंकरराव चव्हाण साहेब व मा. गृहमंत्री बाळासाहेब सावंत यांचा आशीर्वाद रामभाऊंना होता. त्यामुळे ते विधानसभेवर निवडून येण्यापूर्वी त्यांना १९७४ साली विधानपरिषदेची आमदारकी मिळाली. पूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाला मागास वर्ग म्हणून ज्या सवलती होत्या. त्या परत देण्याचे शासनाने मान्य केले होते. त्याचप्रमाणे कुणबी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कोकण आर्थिक विकास मंडळाची स्थापना झाली. आज ते आदरणीय लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ या नावाने अस्तित्वात आहे. परंतु त्याचा फायदा समाजाला जेवढ्या प्रमाणात व्हायला पाहिजे तेव्हढ्या प्रमाणात होताना दिसत नाही. तसेच गुहागर तालुका हा डोंगरी तालुका म्हणून घोषित करावा अशी त्यांची मागणी होती. परंतु त्यांच्या अकस्मात जाण्याने ती मागणी अपूर्ण राहिली. तसेच पूर्वी जातनिहाय जनगणना होत होती, तशीच होणे गरजेचे आहे असे रामभाऊंना मनापासून वाटत होते. MLA Bendal’s memorial day today

समाज संघटना बांधणी

सुमारे ४६ वर्षापूर्वीची कुणबी समाजाची स्थिती आज बऱ्याच प्रमाणात प्रगतीकडे वाटचाल करणारी, विकसनशील अशी आहे. यात रामभाऊंचा मोलाचा वाटा आहे. जनसेवेमुळे लोकांच्या मनात “देवमाणूस” म्हणून ते श्रद्धास्थान बनले. समाज संघटनेची रचनात्मक चौकट गावा-गावातील वाडी-वाडीतून त्यांनी खऱ्या अर्थाने बसवली. समाजातील अनिष्ट चालीरीती नष्ट करून समाजाची आचारसंहिता ठरणारी “समाजपुस्तिका” १५ ऑगस्ट १९८५ च्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी प्रसिध्द केली. ६ व ७ मार्च १९८३ आणि ४ व ६ मार्च १९८९ मध्ये भव्यदिव्य अशी समाज संघटनेची अधिवेशने घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य केले. लग्नपद्धत, पुनर्विवाह, अंत्यविधी यासारख्या धर्मिक कार्यातील अनिष्ट रूढी, अंधश्रद्धा लोकांना पटवून त्यांनी त्या काढून टाकावयास लावल्या. व शास्त्रीय विचारांचा पाया घालून दिला. मुलींना माध्यमिक व उच्च शिक्षण घेता यावे यासाठी गुहागर येथे त्यांनी मुलींचे “प्रियदर्शनी कमला नेहरु वसतिगृह” सुरू केले. वैयक्तिक व प्रापंचीक सुखापेक्षा समाज सौख्याला रामभाऊंनी आपलेसे करून त्यामध्ये सर्वार्थाने आपले जीवन सार्थकी केले. MLA Bendal’s memorial day today

बेकारी नष्ट करण्यासाठी औद्योगिक प्रगतीचे प्रयत्न

गुहागर तालुक्यातील तरूणांना रोजगार मिळावा. व औद्योगिकरणातून प्रगती साधता यावी यासाठी विशेष प्रयत्नातून गुहागर अंजनवेल येथे  (दाभोळ वीज प्रकल्प/ आत्ताची रत्नागिरी गॅस कंपनी) आणण्याचे मोठे काम त्यांनी अनेक कार्यकर्ते बरोबर घेऊन एकजुटीने केले.
रामभाऊंसारख्या निःस्वार्थी वृत्तीच्या खंबीर नेतृत्वाची जेव्हा जनतेला खरी गरज होती त्याचवेळी काळाने या लाडक्या नेत्याला २४ जुलै १९९४ रोजी आपल्यातून हिरावून नेले. आपले संपूर्ण जीवन लोकसेवेला वाहिलेल्या या नेत्याच्या पश्चात त्यांचे सुपुत्र श्री. राजेशजी बेंडल (नगराध्यक्ष, गुहागर नगर पंचायत) यांनी लोकसेवेचे व्रत अंगिकारले आहे. निःस्वार्थी धीरगंभीर, उदात्त व गरिबांना न्याय मिळवून देण्याची त्यांची वृत्ती आहे. MLA Bendal’s memorial day today

रामभाऊंनी आपल्या ध्येयपूर्ण जीवनासाठी आयुष्याचा यज्ञ केला. कार्यकर्त्यांनी त्यांचे आदर्श अंगीकारुन त्यांच्या कार्यकाळात अपुरी राहिलेली कामे पूर्ण होण्यासाठी योगदान द्यावे, हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या त्यागमूर्तीला आमचे विनम्र अभिवादन. MLA Bendal’s memorial day today

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMLA Bendal's memorial day todayNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.