रत्नागिरी नगर वाचनालयातर्फे दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता
रत्नागिरी, ता. 22 : नगर वाचनालयात शनिवार दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता मी भारतीय या दीर्घांकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिलीप तुंगारे लिखित या दीर्घांकाचे सादरीकरण होणार आहे. तरी रत्नागिरीकरांनी या दीर्घांकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि उपाध्यक्ष संतोष प्रभू यांनी केले आहे. Hosted by Mi Bhartiya drama

असंख्य क्रांतिकारकांची आहुती, असंख्य घरदार, संसार यांची आहुती देऊन १०० वर्षांच्या अथक प्रयत्नांनी भारताला स्वातंत्र्याचा मिळाले. भारतात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. मधल्या काळात आपला देश खुप पुढे गेला आहे. सतत प्रगतीपथावर राहून जगाच्या नकाशावर भारताने आपला ठसा उमटवला आहे. हे सगळं होत असताना आजची पिढी मात्र देशप्रेमापासून दूर जाताना दिसत आहे. परदेशात स्थायिक होण्याची स्वप्न उराशी बाळगत आहे. ‘मी भारतीय..’ ही भावना कमी होतेय की काय असे चित्र दिसू लागले आहे. म्हणूनच आजच्या पिढीला १९४७ मधल्या आहुतींची जाणीव करुन देणे, त्यांच्या मनात देशप्रेमाचे रोपटं रुजवणे आणि ‘मी भारतीय..!’ आहे ही जाणीव करून देण्यासाठी हा दीर्घांक साकारण्यात येत आहे. Hosted by Mi Bhartiya drama

शनिवार दि. २३ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता या दीर्घांकाचे सादरीकरण रविंद्र देवधर व हृषिकेश कानडे करणार आहेत. संकल्पना व दिग्दर्शन रविंद्र देवधर यांची आहे. यासाठी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी या दीर्घांकाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन आणि उपाध्यक्ष संतोष प्रभू यांनी केले आहे. Hosted by Mi Bhartiya drama