• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 October 2025, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बजाज फिनसर्व्हचा सर्टिफिकेट कोर्स सुरू

by Mayuresh Patnakar
July 22, 2022
in Guhagar
17 0
0
Bajaj Finserv's Certificate Course Starts
33
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

पाटपन्हाळे महाविद्यालयात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केले उद्घाटन

गुहागर, ता. 22 : पाटपन्हाळे (Patpanhale College) कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालमध्ये सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन बॅंकिंग, फायनान्स आणि इन्शूरन्सचे उद‌्घाटन बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) या कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर पल्लवी गांधिलकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा कोर्स भारतातील प्रतिष्ठित व नामांकित अशा बजाज फिनसर्व्ह कंपनीकडून तयार करण्यात आला आहे. सध्याची बाजारपेठेतील गरज व होत असलेले बदल विचारात घेऊन भविष्यातील येणाऱ्या मनुष्यबळामध्ये विविध कौशल्ये विकसित व्हावीत, यासाठी व्यावसायिक पातळीवर हा कोर्स तयार करण्यात आला आहे. या कोर्ससाठी पाटपन्हाळे महाविद्यालय व बजाज फिनसर्व्ह या कंपनीतर्फे सांमजस्य करार करण्यात आला आहे. Bajaj Finserv’s Certificate Course Starts

भारतातील काही मोजक्याच कॉलेजना हा कोर्स बजाज फिनसर्व्हतर्फे (Bajaj Finserv) देण्यात आला आहे. त्यामध्ये पाटपन्हाळे महाविद्यालयाचाही समावेश आहे. सदर कोर्स हा एक १२० तासांचा आहे.  याचे मार्गदर्शन करण्यासाठी विशेष प्रशिक्षक म्हणून ठाणे येथील नरहर देशपांडे, सांगली येथील ज्ञानेश वैद्य आणि मुंबईचे अंकित खंडेलवाल यांची नियुक्ती कंपनीकडून करण्यात आली आहे. या कोर्समार्फत विद्यार्थ्यांमध्ये विमा, बॅंकिंग, संदेशवहन विषयक तसेच मुलाखतविषयक विविध कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. Bajaj Finserv’s Certificate Course Starts

Bajaj Finserv's Certificate Course Starts

आपल्या उद्घाटन मनोगातामध्ये बजाज फिनसर्व्ह (Bajaj Finserv) या कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर पल्लवी गांधिलकर यांनी विद्यार्थ्यांनी भविष्याचा विचार करून आपले करिअर घडविण्यासाठी या कोर्सचा उपयोग कसा करता येईल हे स्पष्ट केले. हा कोर्स सर्वसामान्य विद्यार्थ्याला लक्षात घेऊन कशाप्रकारे तयार केला आहे हे स्पष्ट केले. या कोर्सचा उपयोग करून विध्यार्थ्यांना खाजगी व सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, बॅंकिग कंपन्या आणि इतर खाजगी कंपन्या यामध्ये कशाप्रकारे करिअर करता येईल हे स्पष्ट केले. या कोर्समार्फत विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास कसा होईल हे देखील पाहिले जाते. तसेच कंपनीतर्फे या कोर्समधील विद्यार्थ्यांसाठी लवकरच कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करून नोकरीच्या संधी उपलब्ध केल्या जाणार जाणार आहेत असे सांगितले. Bajaj Finserv’s Certificate Course Starts

या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे (Patpanhale College) अध्यक्ष भालचंद्र चव्हाण उपस्थित होते. त्यानी आपल्या मार्गदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी या कोर्सचा उपयोग आपल्या करिअरसाठी करावा. व आपले भविष्य उज्वल करावे असे सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य पी. ए. देसाई यांनी विद्यार्थ्यांना हा कोर्स त्यांच्या प्रगतीमध्ये एक मैलाचा दगड ठरेल, असे सांगितले. विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. या कोर्सची दुसरी बॅच लवकरच सुरू केली जाणार असे सांगून परिसरातील शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा पदवी पुर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यात सहभाग घेण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.

सध्या या कोर्समध्ये एकूण ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कोर्सचे समन्वयक म्हणुन प्रा. सुभाष खोत कार्य पाहणार आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. सुभाष खोत यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा गजभिये लंकेश यांनी केले. Bajaj Finserv’s Certificate Course Starts

Tags: Bajaj Finserv's Certificate Course StartsGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share13SendTweet8
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.