• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
21 August 2025, Thursday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ओक कुटुंबाच्या समाजाभिमुख दातृत्वाला सलाम

by Ganesh Dhanawade
July 16, 2022
in Guhagar
20 0
2
Dedication of the chariot by Chaitali Medical
39
SHARES
111
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 16 : जन्मापासून लहान मुलाला जे साहित्य लागते त्यापासून ते वैकुंठापर्यंतच्या प्रवासाचा विचार चैताली मेडिकलचे अरुण ओक यांनी केला. त्यांनी आज येथील जनतेला दिलेला वैकुंठ रथ ही अद्वितीय संकल्पना आहे.  त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या समाजाभिमुख दातृत्वाला मी सलाम करते, असे प्रतिपादन तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले. त्या चैताली मेडीकलच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होत्या. Dedication of the chariot by Chaitali Medical

गुहागर शहरातील चैताली मेडीकलच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त अरूण ओक यांनी गुहागर शहरवासीयांसाठी सुमारे ७ लाख रूपये खर्च करून वैकुंठ रथ दिला आहे. हा वैकुंठ रथ गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल व मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आला. त्या पुढे म्हणाल्या की, मानवाचा अखेरचा प्रवास सुखकर व्हावा. त्याला वेदना होऊ नये याचा विचार केवळ संस्कारक्षम कुटुंबच करू शकते. Dedication of the chariot by Chaitali Medical

Dedication of the chariot by Chaitali Medical

समाजासाठी त्यांचे हे सत्पात्री दान आहे. याचबरोबर त्यांच्या पत्नी संस्कारक्षम वर्गही चालवत असून आत्ताच्या पीढीला घडविण्याचे काम त्याच्याकडून केले जात आहे. नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी ओक यांच्या जीवनप्रवासात त्यांनी सातत्याने विविध मार्गाने मदतीचा हात पुढे केला आहे. आज त्यांनी नगरपंचायतीकडे वैकुंठ रथ दिला. त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला जाईल. शहराच्या विकासात अशाप्रकारच्या व्यक्तींचा सहभाग महत्वाचा असतो. ओक यांनी नगरपंचायतीकडे दिलेल्या या रथाची जबाबदारी आमची आहे. त्यांच्या या उपक्रमाला सर्व जनतेच्या व नगरपंचायतीच्यावतीने धन्यवाद देतो, असे नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले.

Dedication of the chariot by Chaitali Medical

पोलिस निरिक्षक बी. के. जाधव बोलताना  म्हणाले की, ज्यावेळी बेवारस मृतदेह मिळून येतात. त्यावेळी त्यांना स्माशनभूमिपर्यंत आणण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. यामुळे अशी समस्या दूर करण्यासाठी ओक परिवाराने दातृत्वाने दिलेला हा वैकुंठ रथ नक्कीच तालुकावासीयांसाठी उपयोगात येईल, असे सांगितले. Dedication of the chariot by Chaitali Medical

या लोकार्पण कार्यक्रमातून वैकुंठ रथ वाहनाच्या चाव्या गुहागर नगरपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्यानंतर वैकुंठ रथासमोर तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी श्रीफळ वाढवीला. यावेळी चैताली मेडीकलचे जुने कर्मचारी मनोज सांडीम, सदानंद जांगळी यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच या वैकुंठ रथाच्या गाडीचे कायमस्वरूपी मेंटनेन्स करण्याची जबाबदारी घेणारे वैद्य आटोमोबाईलचे मालक प्रसाद वैद्य यांचाही श्री. अरुण ओक यांनी सत्कार केला. ओक कुटुंबीयांनी हर घर झेंडा या उपक्रमासाठी गुहागर नगरपंचायतला 5000/- धनादेश दिला. अरूण ओक यांनी आतापर्यंतच्या प्रवासात मला चिपळूण अर्बन बॅकेने वेळोवेळी त्वरीत सहकार्य केल्याचे आवर्जून सांगितले. Dedication of the chariot by Chaitali Medical

Dedication of the chariot by Chaitali Medical

यावेळी तहसिलदार सौ. प्रतिभा वराळे, नगराध्यक्ष राजेश बेंडल, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, पोलिस निरिक्षक बी. के. जाधव, जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष उमेश शिंदे, अरूण ओक, निहाल गुढेकर, अजय खातु, प्रसाद वैद्य, संजय सावरकर, राजेंद्र आरेकर, राजन दळी, मंगेश खोत, ऊमेश जोशी, नितीन बेलवलकर, विनायक बारटकके, सचिन मुसळे, अशोक आठवले, नगरसेवक अमोल गोयथले, गजानन वेल्हाळ, प्रसाद बोले, माधव साटले, नगरसेविका स्नेहा भागडे, मृणाल गोयथले, स्नेहल रेवाले, सुजाता बागकर, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष वरंडे यांनी केले. तर आभार चीन्मय ओक यांनी मानले. Dedication of the chariot by Chaitali Medical

Dedication of the chariot by Chaitali Medical
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share16SendTweet10
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.